esakal | जळगाव जिल्ह्यासाठी हवे रेल्वे आयसोलेशन कोच; माजी महापौरांनी केंद्रीय मंत्र्यांना केली मागणी 

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यासाठी हवे रेल्वे आयसोलेशन कोच; माजी महापौरांनी केंद्रीय मंत्र्यांना केली मागणी 

रुग्णांसाठी २० बेडची व्यवस्था, प्रत्येक डब्यात डॉक्टरांसाठी एक केबिन, ऑक्सिजन सिलिंडर लावण्याची सोय, अंघोळीसाठी बाथरूम अशी व्यवस्था आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी हवे रेल्वे आयसोलेशन कोच; माजी महापौरांनी केंद्रीय मंत्र्यांना केली मागणी 
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून, शासकीय व खासगी रुग्णालयांतील बेड फुल झाले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने तयार केलेले रेल्वे कोविड आयसोलेशन कोच जळगाव जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी माजी महापौर भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

आवश्य वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 
 


त्यांनी याबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असता, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद असून, शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. महापौर भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. 

...असे आहे हे कोच 
रुग्णांसाठी २० बेडची व्यवस्था, प्रत्येक डब्यात डॉक्टरांसाठी एक केबिन, ऑक्सिजन सिलिंडर लावण्याची सोय, अंघोळीसाठी बाथरूम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक डब्यात पॅरामेडिकल स्टाफ स्थानिक प्रशासनाने नियुक्त करायचा आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे