तयारी तिसऱ्या लाटेची : बालकांसाठी मोहाडीत शंभर खाटा राखीव

कोरोना असलेल्यांना ‘म्युकरमायकोसिस’च्या लक्षणांबाबत वारंवार विचारावे
bed
bedbed

जळगाव : कोरोना (corona) महामारीची (Epidemic) दुसरी लाट (second wave) आता ओसरत आहे. यामुळे काही महिने तरी कोरोनापासून सुटका होणार आहे. मात्र तथाकथित तिसरी लाट (third wave) आली तर लहान बालकांवर अधिक परिणाम होईल. यामुळे बालकांची अधिक काळजी आरेाग्य विभागाला या लाटेत घ्यावी लागणार आहे. जिल्हा रुग्णालयात बालरोग विभागात ७० खाटा (Bed) आहेत. याशिवाय १०० अतिरिक्त खाटा खास बालकांवर उपचार करण्यासाठी मोहाडी येथील रुग्णालयात (Mohadi government hospital) ठेवण्याचा निर्णय जिल्हास्तरीय टास्क फोर्सने घेतला आहे.

(government has kept hospital beds ready decision by task force)

bed
कोरोना संसर्गाची तीव्रता कमी..पण मृत्यूच्या आकड्यांनी चिंता वाढवली

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, टास्क फोर्स समितीचे पदाधिकारी, शहरातील बालरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा, नेत्रतज्ज्ञ, ‘आयएमए’पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.


‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांबाबत दक्षता गरजेची
‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांसाठी वॉर्ड क्रमांक सात जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र करण्यात आला आहे. या व्याधीच्या रुग्णांबाबत अधिक चांगल्या प्रकारे दक्षता कशी घेतली पाहिजे, कान-नाक-घसा, नेत्रतज्ज्ञांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. कोरोनाबाधित झाल्यानंतर जर ही व्याधी आली तर अधिक दक्षता कशी घ्यावी? वेळीच जर रुग्णाला या व्याधीची लागण झाल्याचे लक्षात आले तर तातडीने उपचार केल्यास या व्याधीचा रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, असा विश्‍वास या वेळी डॉक्टरांनी मार्गदर्शनातून सांगितला. यामुळे कोरोना असलेल्यांना ‘म्युकरमायकोसिस’च्या लक्षणांबाबत वारंवार विचारावे, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर त्या अनुषंगाने उपचार केले जावेत, असे सांगण्यात आले.

(government has kept hospital beds ready decision by task force)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com