esakal | रावेरमध्ये कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लवकरच ड्युरा सिलिंडर 

बोलून बातमी शोधा

रावेरमध्ये कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लवकरच ड्युरा सिलिंडर 

तीनही ठिकाणी एक सिलिंडर बसविण्यात येत असून, तीनही ठिकाणी प्रत्येकी एक सिलिंडर अतिरिक्त देण्यात येत आहे.

रावेरमध्ये कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लवकरच ड्युरा सिलिंडर 
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : कोरोना रुग्णांचे जीव वाचविण्याला प्राधान्य देत येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या क्षमतेचे ऑक्सिजन (ड्युरा) सिलिंडर तातडीने बसविण्यात येत असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी येथे बोलताना दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात ही प्रणाली लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे या वेळी उपस्थित होते. 
 

आवश्य वाचा- सातपुडा जगंलात घडली थरारक घटना ; परप्रांतीय शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकावर केला गोळीबार

आमदार चौधरी म्हणाले, की रावेर, फैजपूर आणि न्हावी येथेही अशीच यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. या तीनही ठिकाणी एक सिलिंडर बसविण्यात येत असून, तीनही ठिकाणी प्रत्येकी एक सिलिंडर अतिरिक्त देण्यात येत आहे. आमदार निधी आणि लोकवर्गणीतून हे कार्यान्वित करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास आपण व्यक्तिगत देखील यास हातभार लावू, असे ते म्हणाले. या वेळी येथील केळी व्यापारी सुरेश नाईक यांनी या ऑक्सिजन प्रणालीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश आमदार चौधरी यांना दिला.

तालुक्यातील सरपंच संघटना- १ लाख रुपये, कृषी उत्पन्न बाजार समिती - ५१ हजार रुपये, रावेर पीपल्स बँक- ५१ हजार रुपये आणि महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना, रावेर- (एक दिवसाचा पगार), क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशन - १ लाख रुपये या सिलिंडरसाठी आर्थिक हातभार लावणार आहेत. याप्रसंगी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन, काँग्रेसचे मेडिकल सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन, सरपंच संघटनेचे तालुका सचिव महेंद्र पाटील, सदस्य गणेश महाजन, ज्ञानेश्वर महाजन बाजार समितीचे व्यवस्थापक गोपाल महाजन, उपसरपंच राहुल पाटील, संजय पाटील, संतोष पाटील उपस्थित होते.