esakal | जळगाव जिल्ह्यात आठ दिवसापासून बंद लसीकरण सुरू; लस घेण्यासाठी गर्दी 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात आठ दिवसापासून बंद लसीकरण सुरू; लस घेण्यासाठी गर्दी 

जळगाव जिल्ह्यात आठ दिवसापासून बंद लसीकरण सुरू; लस घेण्यासाठी गर्दी 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः गेल्या आठ दिवसांपासून ठप्प असलेले कोरोना लसीकरण आजपासून पूवर्वत सुरू झाले आहे. कोरोनावर आता लस आल्याने तीच घेणे आपल्या फायद्याचे असल्याची जाणीव नागरिकांना झाल्याने आज सर्वच लसीकरण केंद्रावर आज लस टोचून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जिल्ह्यात काल तब्बल सात दिवसांनी कोरोना लसींचा पुरवठा झाला आहे. ४० हजार २०० लसी उपलब्ध झाल्याने शहरातील बहुतांश सर्वच लसीकरण केंद्रे सुरू झाली. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर पोचल्या आहेत.

नागरिकांची भटंकती

शहरात गेल्या बुधवारपासून सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. यामुळे नागरिकांना लसींसाठी भटकंती करावी लागली. आज मात्र लसी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी सकाळपासूनच शहरातील विविध केंद्रावर जावून लसीकरण करून घेतले.

शासकीय, खासगी केंद्रावर लसीकरण सुरू

कोव्हिशील्ड लसींचे डोस घेण्यासाठी शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगर रुग्णालय व खासगी ठिकाणी लसीकरण सुरू झाले होते.