esakal | आश्‍वासन मिळूनही जळगाव जिल्ह्याला कोरोना लस मिळेना 

बोलून बातमी शोधा

आश्‍वासन मिळूनही जळगाव जिल्ह्याला कोरोना लस मिळेना 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना लसीकरण महत्त्वाचे आहे. १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण करणे गरजेचे असताना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आश्‍वासन मिळूनही जळगाव जिल्ह्याला कोरोना लस मिळेना 
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव  ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालपासून ते १४ एप्रिलपर्यंत टीका महोत्सवाची (लसीकरण) घोषणा केली आहे. जळगाव जिल्ह्यात लस उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन आरोग्य विभागातर्फे मिळाले. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत लसीचा पुरवठा झाला नसल्याचे चित्र होते. यामुळे ‘टीक महोत्सवाचा’ दुसरा दिवसही वाया गेला आहे. 

आवर्जून वाचा- कोरोनाचा उद्रेक सुरुच.. जळगाव जिल्ह्यात बळींची संख्या अठराशे पार  ​
 


शहरात सोमवारी सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. या मुळे नागरिकांना लसींसाठी भटकंती करावी लागली. मात्र लस उपलब्ध झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. पाच दिवसांपासून कोव्हिशील्ड लस उपलब्ध नाही. गेल्या आठवड्यात चार दिवस केंद्रे बंद होती. अद्यापही ती बंदच आहेत. जिल्ह्यात लसच नसेल, तर आरेाग्य विभाग टीका महोत्सव कसा साजरा करणार. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण महोत्सव घेऊ, अशी भूमिका आरोग्य यंत्रणेची आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना लसीकरण महत्त्वाचे आहे. १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण करणे गरजेचे असताना लसींचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य विभागही हतबल झाला आहे. 

पाठवलेल्या लसी संपल्यात
जिल्ह्यात कोव्हिशील्ड लसींचे दोन लाख चार हजार ३४० डोस आले होते. त्यातील एक लाख ९५ हजार ५४० डोस वापरले गेले. आठ हजार ८०० डोस दोन दिवसांत ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर पाठविण्यात आले. को-व्हॅक्सिन लसींचे १८ हजार डोस आले होते. तेही संपल्यात आहे. 

आवर्जून वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 
 

लस येणार म्हणून केंद्रावर गर्दी
शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगर रुग्णालय व खासगी ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर आज लस येणार असल्याने अनेकांनी लसीकरणासाठी गर्दी केली. लस नसल्याने त्यांची निराशा झाली. 
 

जिल्ह्यात आज ३५ हजार ७५५ कोव्हिशील्ड लस उपलब्ध होणार आहेत. तसे आरेाग्य उपसंचालक विभागाकडून सांगण्यात आले होते. सायंकाळपर्यंत लस उपलब्ध होतील. 
-डॉ. एन. एस. चव्हाण, 
जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन- भूषण श्रीखंडे