कोरोना लसिकरण नियमांचे उल्लंघन; जामनेर रुग्णालयात १६ वर्षांच्या मुलाला दिली लस 

कोरोना लसिकरण नियमांचे उल्लंघन; जामनेर रुग्णालयात १६ वर्षांच्या मुलाला दिली लस 
Updated on

जळगाव ः जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. सुरवातीस आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनाच लस देण्याचे शासनाने ठरविले असले तर डॉक्टर मंडळ आपल्या घरातील व्यक्तींचाही त्यात समावेश असल्याचे समोर येत आहेत. गेल्या आठवड्यात जामनेर उपजिल्हा रुग्णालयात एका १६ वर्षांच्या मुलाला लस दिल्याचा प्रकार घडला. 

यावरून कोरोना लसीकरणात शासकीय व खासगी क्षेत्रातील ज्या व्यक्तींनी आरोग्य क्षेत्राच्या नावाखाली खासगी क्षेत्रातील ज्यांची नावे दिली त्यांनाही लसीकरण होत असल्याचा प्रकार घडत आहे. या प्रकाराकडे आरेाग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

लसीकरणात नियमांचे उल्लंघन 
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून फक्त आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनाच लस देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण सुरू झाले. त्यात खासगी वैद्यकीय क्षेत्राच्या नावाखाली कुटुंबातील व्यक्ती, नातेवाइकांना लसीकरण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय नसताना संबंधितांना लस का दिली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सोळावर्षीय मुलास लस 
जामनेर उपजिल्हा रुग्णालयात १६ वर्षांच्या मुलाला कोरोना लस दिली गेली. १६ वर्षांचा मुलगा डॉक्टर, वॉर्डबॉय अशा कोणत्या पदावर असेल. जिल्हा रुग्णालयात सत्तरी पार केलेल्या डॉक्टर म्हणून नाव असलेल्या व्यक्तीस लस दिली गेली. असे एक ना अनेक प्रकार घडत आहेत. नेमकी लस वैद्यकीय क्षेत्रातील असताना त्यांच्या कुटुंबीयांची, नातेवाइकांची नावे कशी आली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेने नावे घेताना ज्यांची नावे आहेत ती व्यक्ती त्याच क्षेत्रातील आहे याची खात्री करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारणी करणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रासाठी अगोदर लस आहे त्याचा लाभ इतरच घेतील. 

४३ हजार लसींचा पुरवठा 
जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ३२० कोरोना लसींचा पुरवठा झाला आहे. त्यात पाच हजार ५५५ जणांना लस दिली गेली आहे. १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होईल. 
 

जामनेर उपजिल्हा रुग्णालयात १६ वर्षांच्या मुलाला लस दिली असा प्रकार माझ्यापर्यंत आला नाही. खासगी आरोग्य क्षेत्रातून जी यादी आली होती, त्याप्रमाणे लस दिली जात आहे. ती यादी देताना फक्त डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक यांचीच यादी हवी होती. 
-डॉ. एन. एस. चव्हाण, 
जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Yogesh Nemade
Marathi News Esakal
www.esakal.com