Cotton Crop Disease : कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव; पिके उपटून फेकण्याची बळीराजावर वेळ...

blight disease on cotton
blight disease on cottonesakal

Cotton Crop Disease : आधीच पाऊस नाही अन् त्यात तालुक्यातील जानवे, डांगर व रणाईचे परिसरात कपाशीवर लाल्या व मर रोग पडू लागल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून फेकून दिली आहे.

तर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (cotton crop is infected with blight disease jalgaon news)

गेल्या वर्षी भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलेला आहे, पाऊस पडत नाही, ज्यांनी बागायती कापूस लावला, रोपे उगली मात्र लागलीच लाल्या आणि मर रोग पडू लागल्याने आज एक रोप सुकते दुसऱ्या दिवशी प्रमाण वाढते, तिसऱ्या दिवशी शेकडो रोपे जळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जानवे येथील प्रकाश विक्रम पाटील यांनी आपली रोपे उपटून फेकली आहेत. बियाणे आणि खते यांचा खर्च वाया गेला आहे. हीच परिस्थिती जानवे व रणाईचे परिसरात इतर शेतकऱ्यांची झाली आहे.

किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, कृष्णा पाटील, कमलेश शांताराम पाटील, सरपंच सरला प्रकाश पाटील, गोपाल पाटील यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांना निवेदन देऊन १ जूनला लागवड केलेल्या कापसावर लाल्या रोग पडू लागल्याने पिके जळत आहेत. तरी शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

blight disease on cotton
Cotton Farmer : दरवाढ नाहीच! पांढरं सोनं कवडीमोल झाल्याने, आहे त्या दरात कापूस विक्री

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर, सहायक कृषी अधिकारी किरण पाटील, सहायक कृषी अधिकारी सोनवणे यांनी जानवे येथे जाऊन विविध शेतात जाऊन कपाशीच्या पिकांची पाहणी केली व बियाणे वितरक संजय पाटील यांना व्हिडीओवरून परिस्थिती दाखवली.

शासनाने मदत द्यावी

अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कपाशी पडून आहे. कपाशीच्या दरात वाढच न झाल्याने इतक्या दिवसांपासून सांभाळून ठेवलेली कपाशी कमी दरातही विकता येत नसल्याने शेतकरी चांगले अडचणीत सापडले आहेत.

बियाणे, खते, किटकनाशके, शेतीची मशागत, मजुरी यावर मोठा खर्च झालेला आहे. आता पाऊस नसल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करायची झाल्यास, शासनानेच आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सध्या राज्यातील सत्तासंघर्षांचे चित्र पाहता, ही आशा देखील नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

blight disease on cotton
Cotton Crop Crisis : पाऊस लांबल्याने कापूस पीक धोक्यात; वाढत्या तापमानाचा कापूस उत्पादकांना फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com