बेड नाही..उपचारासाठी रुग्ण, नातलगांची फिरफिर

बेड नाही..उपचारासाठी रुग्ण, नातलगांची फिरफिर

जळगाव : गेल्या वेळच्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णच नव्हे तर संपूर्ण आरोग्य यंत्रणाच होरपळून निघत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये बेड आहेत; पण डॉक्टरांसह कर्मचारी बाधित, तर खासगी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहेत; पण बेड नाही, अशी स्थिती निर्माण झालीय. त्या मुळे रुग्णांसह नातलगांची फिरफिर होतेय. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जून ते सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. संसर्गाचे ‘पीक’ येऊन गेले असे तेव्हा वाटत होते. ऑक्टोबरपासून संसर्ग नियंत्रणातही आला. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण वाढू लागले. मार्च महिन्यात जिल्ह्यातील स्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र निर्माण झाले. 

यंत्रणाच झाली बाधित 
एकीकडे रुग्णसंख्या पटीने वाढत असताना शासकीय रुग्णालयांतील यंत्रणाच बाधित होऊ लागली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निम्म्याहून अधिक डॉक्टर, कर्मचारी बाधित झाले आणि बेड असूनही रुग्णांवर उपचार करणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली. नॉनकोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी अन्य पर्याय उभे करण्यात आले. मात्र त्यातही ते रुग्ण होरपळून निघत आहेत. 

खासगी हॉस्पिटल फुल 
प्रशासनातर्फे दररोज बाधित रुग्णांचा आकडा, विलगीकरण कक्षातील बेड, कोविड हॉस्पिटल, केअर सेंटरमधील बेड, ऑक्सिजन व आयसीयूतील रुग्ण आदींचे विवरण दररोज प्रसिद्धीस दिले जाते. बेड पुरेसे आहेत, असाही दावा केला जातो. प्रत्यक्षात, रुग्ण दाखल होताना ‘बेड’ नाही, असे सांगितले जाते. शासकीय व खासगी अशा दोन्ही हॉस्पिटलमध्ये सध्या असेच सांगितले जातेय. खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचारी तर आहेत; पण बेड नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

ऑक्सिजन बेडसाठी वणवण 
ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्‍यकता आहे त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये जागा नाही. खासगी हॉस्पिटलही फुल आहेत. त्या मुळे या रुग्णांची अधिक फरफट होत आहेत. ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांचा जीवही जात आहे. 


लॅब, सीटी स्कॅन सेंटरही फुल 
कोरोना रुग्ण वाढत असताना कोविड प्रोफाइलसंबंधी रक्त चाचण्या, छातीचा एक्स-रे व सीटी स्कॅन करण्यासाठी या सेंटरमध्येही रुग्णांची गर्दी होत आहे. चाचण्यांसाठी हजारो रुपये लाटणाऱ्या या लॅब, सेंटरमध्ये रुग्णांना बसायलाही जागा नाही, अशी स्थिती आहे. 

कोठे किती बेड -- पूर्वी -- आता वाढविले -- एकूण 
शासकीय महाविद्यालय -- १२५ -- १५० -- २७५ 
ोडॉ. उल्हास पाटील रुग्णालय -- ४०० -- ० -- ४०० 
देवकर महाविद्यालय -- ० -- १०० -- १०० 
इकरा महाविद्यालय --- ० -- १०० -- १०० 
महिला रुग्णालय (मोहाडी रोड) -- ० -- ० -- २०० 
शासकीय होस्टेल -- ० -- ० -- २६५ 
सर्व डीसीसी, सीसीसी -- ० -- ० -- ७ हजार 
खासगी रुग्णालय -- ० -- ० -- १ हजार 

जिल्ह्यात एकूण दहा हजार बेड 
* त्यात दोन हजार ऑक्सिजन बेड 
* सिव्हिलला- २५० (ऑक्सिजन), व्हेंटिलेटर-११६, आयसीयू- ५६ 
* गोदावरीत २५ (ऑक्सिजन व व्हेंटिलेटर) 
* सर्व तालुकास्तरावर एकूण शंभर बेड 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com