Jalgaon : ‘त्या’ मृत बालकाची विल्हेवाट लावणाऱ्यांवर गुन्हा

crime news
crime newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ एका शाळेमध्ये एक महिन्याच्या बालकाचा बेवारस मृतदेह आढळला आहे. या संदर्भात मंगळवारी (ता. ६) रात्री आठला शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Crime against those who dispose dead child body Jalgaon Latest Marathi News)

crime news
Ganeshotsav 2022 : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांची जय्यत तयारी

शहरातील छत्रपती शिवाजीनगरातील रेल्वे उड्डाणपूल तयार होऊन नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी सातच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ अंदाजे एक महिन्याच्या बालकाचा बेवारस मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संदीप परदेशी, पोलिस नाईक ललित भदाणे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंचनामा केला होता.

दरम्यान, बालकाच्या मृतदेहाजवळ कपडे, औषधी, काळा दोरा, दूध पिण्याची बाटली अशा वस्तू आढळल्या होत्या. बालकाला कुणी पुरले याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर घटनेच्या आठ दिवसांनंतर मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात बालकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार सिद्धार्थ बैसाने तपास करीत आहेत.

crime news
Nashik : 5 दिवसात 299 गणेशमूर्तींचे संकलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com