Latest Marathi News |अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boy Kidnapping Crime Case

Crime Case : अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

चाळीसगाव : मित्राकडून नोट्स घेऊन येतो, असे सांगून गेलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना शहरातील आदर्शनगरात उघडकीला आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आदर्शनगरातील ओमप्रकाश रतन थेटे (वय ४५) तालुक्यातील पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्याकडे त्यांचा सोळावर्षीय पुतण्या शिकायला असून, तो पिंपरखेड येथील शाळेत अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे.(Crime Case Minor boy kidnap lured Jalgaon Crime News)

हेही वाचा: Crime News : फाईल्ससह रक्ताने माखलेला चाकु भोईटेंच्या घरात केला प्लांट

तो शुक्रवारी (ता. ७) रा. वि. महाविद्यालय, चाळीसगाव येथील मित्राकडून नोट्स घेऊन येतो, असे घरच्यांना सांगून गेला. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ओमप्रकाश थेटे शाळेवरून घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला पुतण्याबाबत विचारपूस केली असता तो मित्रांकडे नोट्स घेण्यासाठी गेल्याचे सांगितले.

त्यावर ओमप्रकाश थेटे यांनी मित्रांसह परिसरात शोधाशोध केली असता त्याची फक्त सायकल आढळून आली. त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले, अशी खात्री होताच चाळीसगाव शहर पोलिस ठाणे गाठून थेटे यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Jalgaon : बापरे..! जिल्ह्यात ४२० जणांना चावले पिसाळलेले कुत्रे

टॅग्स :Jalgaoncrime