अंधारात लपून बसलेले, पोलिस दिसताच केला गोळीबार; तरी जीवाचीपर्वा न करता कौतूकास्पद कामगिरी !  

चेतन चौधरी 
Monday, 18 January 2021

काही संशयित अंधारात असल्याने वाहन थांबविल्यानंतर त्यातील एकाने ‘भागो रे पुलिस आयी...’ म्हणत पळ काढला

भुसावळ : दरोड्याच्या उद्देशाने जळगाव रस्त्यावरील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ लपून असलेल्या पाच दरोडेखोरांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळत त्यांच्याकडून दोन जिवंत काडतुसासह गावठी कट्टा व दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. शनिवारी रात्री बारानंतरही कारवाई करण्यात आली तर गस्तीवरील पोलिसांना पाहताच संशयितांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी जिवाची बाजी लावत संशयितांचा मुसक्या आवळत त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

आवश्य वाचा- तब्बल..अडीचशे वेळा पाहिला ‘बघितला ’शुटआऊट लोखंडवाला’आणि तयार केली ‘माया गँग’    

भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे हवालदार इकबाल अली इब्राहीम अली सय्यद, पोलिस कर्मचारी भूषण चौधरी, समाधान पाटील, होमगार्ड मायकल, प्रसाद हे पोलिस वाहनाने (एमएच १९, एम ०६३२) ने लक हवालदार चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासह शनिवारी रात्री गस्तीवर असताना लोणारी मंगल कार्यालयासमोरून जात असताना काही संशयित अंधारात असल्याने वाहन थांबविल्यानंतर त्यातील एकाने ‘भागो रे पुलिस आयी...’ म्हणत पळ काढला तर दुसऱ्याने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केली.

पाठलाग करून पकडले

गोळीबार झाल्यानंतर अशाही परिस्थितीत पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. आणि पोलिसांनी राकेश उर्फ डीडी राजू बारे (वय २०) व भूषण उर्फ टक्या यशवंत मोरे (वय २०, हुडको कॉलनी, भुसावळ) यांना पकडले व घटनेची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना दिल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा आरोपींची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांनी साथीदार विल्सन अलेक्झांडर जोसेफ (वय २७), सागर आनंदा पारधे (वय ३०), ऑस्टिन शरद रामटेके (वय २१, सर्व रा.हुडको कॉलनी, भुसावळ) सोबत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news bhusawal police arrest robber shooting