esakal | गुडीपाडव्याचा सणाला भुसावळ हादरले; दगडाने ठेचून तरुणाची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

गुडीपाडव्याचा सणाला भुसावळ हादरले; दगडाने ठेचून तरुणाची हत्या

गुडीपाडव्याचा सणाला भुसावळ हादरले; दगडाने ठेचून तरुणाची हत्या

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : शहरात गुढीपाडव्याच्या सण उत्साहात साजरा होत असताना शहरातील लिंपस क्लब परिसरात एका 34 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गायकवाड (वय 34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आज (ता. 13) दुपारी शहरातील लिंपस क्लब, हनुमान मंदिर समोर असलेल्या मोकळ्या जागेत संदीप गायकवाड याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आई व पत्नी, लहान चिमुकली घटनास्थळी येताच हंबरडा फोडला.

भुसावळ शहरातील चाळीस खोली भागांमध्ये तीस ते पस्तीस वर्षाचा मृतदेह पडले असल्याची माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता 35 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून किंवा तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे खून झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अर्चित चांडक घटनास्थळी पोहोचले व जळगाव येथून फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉड घटनास्थळी तपास करू करत आहे.

मयत इसम हा भुसावळमधील रहिवासी आहे. संदीप गायकवाड याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने दगड घालून खून केला असावा, असं प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे व पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची टीम करत असल्याची माहिती जळगावचे एडिशनल एसपी चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.

अपर पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक संदीप गोसावी, सहा.निरीक्षक संदीप दुणगहू, संकेत झांबरे, ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, बंटी कापडणे तसेच पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयताचा खून कुणी वा कोणत्या कारणाने केला याचा निश्‍चित उलगडा होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

loading image