
आईच्या मोबाईलवरून तरुणीशी संवाद साधून माझे लग्न ठरले असून मला तुला शेवटचे भेटायचे आहे, तुला एक गिफ्ट द्यायचे असे सांगितले अन...
मेहुणबारे (ता.चाळीसगाव): प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून मेहूणबारे(ता.चाळीसगाव) येथे एकतर्फी प्रेमातून तरुणाने 18 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरूणीचा भाऊही जखमी झाला आहे.भाऊ-बहिणीवर हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत आधार चौधरी याच्या विरूद्ध मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आवर्जून वाचा- आवश्य वाचा- पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार
मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथील 18 वर्षीय पीडित तरूणी ही आई वडिल व भावासह राहते. तरुणी ही चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे.सुमारे 10 वर्षापूर्वी या पिडीत तरुणीच्या घरासामोर राहणारा प्रशांत चौधरी याच्याशी तिची ओळख झाली.
माफी मागून बाहेरगावी गेला
प्रशांतने या ओळखीतून त्याने तरुणीला लवशीप ठेवण्याची विनंती केली.मात्र तरुणीने याला नकार देताच तो वारंवार त्रास देवू लागला.हा प्रकार पीडित तरूणीने आपल्या आई वडिलांमार्फत प्रशांतच्या आई वडिलांना सांगितला.झाल्या प्रकाराची त्यांनी माफी मागून प्रशांतला बाहेरगावी पाठवून दिले होते. तेव्हापासून बोलणे चालणे बंद होते.
आवर्जून वाचा- हाड्या चिड्या छिव रे छिव..! शेतकऱ्यांचा देशी जुगाड 'लय भारी'
शेवटच भेट, तुझ्यासाठी गिप्ट आहे..
पीडित तरुणीच्या आईच्या मोबाईलवरून प्रशांतने तरुणीशी संवाद साधून माझे लग्न ठरले असून मला तुला शेवटचे भेटायचे आहे, तुला एक गिफ्ट द्यायचे असून यानंतर तुला भेटणार नाही असे सांगितले. तरुणीने त्यास नकार दिला.
आणि चाकू घेवून घरात घुसला
प्रशांत चौधरी या तरुणाने सोमवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास पीडित तरुणी घरात हातात चाकु घेवून घुसला शिवीगाळ करीत तु माझ्या शिवाय कुणाचीच होवू शकत नाही असे सांगत चाकू तरुणीवर वार केले. तरुणीने आरडाओरड केल्याने.तरुणीचा भाऊ धावत आला असता बोटाला चाकू लागला. पीडितेचे आईवडिल धावत येताच प्रशांत हा पळून गेला.
हेही वाचा- जळगाव जिल्हातील सर्व शासकीय रुग्णालयांचे होणार फायर ऑडिट
पोलिसात गुन्हा दाखल
प्रशांत चौधरी रा. याच्या विरोधात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अरुण पाटील हे करीत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे