esakal | पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुन्हा दुकानावर येत त्याच्या जवळील धारदार ब्लेडने विजय भोई यांच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करुन फरार झाला. 

पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : शहरातील महात्मागांधी मार्केट समोर हातगाडीवर वेफर्स विक्रेताकडून फुकटात वेफर्स घेवून खाणाऱ्याची वेफर्स विक्रेत्याने पोलिसांत तक्रार केली होती. याचा राग आला म्हणुन वेफर्स विक्रेत्यावर एका तरुणाने चेहऱ्यावर ब्लडने वार करून फरार झाला होता. या फरार आरोपीला पोलिसांनी चार दिवसानंतर आज अटक केली आहे.

आवश्य वाचा- चक्क आयुक्तांना मोकाट कुत्र्यांची दिली भेट; कोणी केले असे ? वाचा सविस्तर !

शाहुनगरातील रविहासी विजय आत्माराम भोई हा तरुण गांधी मार्केटच्या बाहेर केळी-बटाटा वेफर्सचे दुकान लावून उदनिर्वाह चालतो.  ८ जानेवारीला गांजाच्या नशेत तर्ररर्र बाळ्या ऊर्फ कल्पेश देविदास शिंपी (वय-२०,रा. दिनकर नगर) व त्याचा साथीदार घाऱ्या असे दोघेही आले. वेफर्स घेवुन पैसे न देताच जाऊ लागल्याने भोई व शिंपी यांच्यात वाद झाला. विजय भोईने पोलिस ठाणे गाठत शिंपी याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. 

पुन्हा येत चेहऱ्यावर केले वार..

तक्रारीनंतर पोलिसांनी नशेतील कल्पेश शिंपीला बोलावून बसवुन ठेवले. संध्याकाळी समज देऊन सोडल्यावर तो, पुन्हा भोईच्या दुकानावर गेला त्याच्या जवळील धारदार ब्लेडने विजय भोई यांच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करुन फरार झाला होता. तपासाधिकारी उल्हास चऱ्हाटे, गुन्हेशोध पथकातील कर्मचाऱ्यांनी संशयीत कल्पेश शिंपीला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायायलयाने त्याची पेालिस कोठडीत रवानगी केली. 

पोलिसांत तक्रार केल्याचा राग.. 
गांजाच्या नशेत तर्रर्र कल्पेश शिंपी यांची पेालिसांत तक्रार केल्याचा राग मनात ठेऊन कल्पेशने विजय भोई याच्यावर धारदार पट्टीने वारकरुन पळ काढला होता. अर्थात पेालिसांना सांगतोय का, घे आता असे म्हत कल्पेनेश चेहऱ्यावर वार केले होते. अर्थात पोलिसांनी समज देऊन सेाडल्याने त्याने विजयला गाठून हल्ला चढवला हेाता. पेालिस माझे काहीच करु शकत नाही, अशा अविर्भावात तो मारुन पळाला होता. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image