गुन्हा करण्याच्या तयारीत आणि पोलिसांची सराईत गुन्हेगारावर झडप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा करण्याच्या तयारीत आणि पोलिसांची सराईत गुन्हेगारावर झडप

गुन्हा करण्याच्या तयारीत आणि पोलिसांची सराईत गुन्हेगारावर झडप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाजळगाव : साधारण सहा वर्षापूर्वी शहरातील प्रजापतनगरात घडलेल्या खून (murdder) प्रकरणातील संशयित युनूस ऊर्फ सलीम सद्दाम पटेल याला शहर पोलिसांच्या (police) पथकाने खानदेश सेंट्रल येथून गावठी पिस्तूल (Pistol) आणि तीन जिवंत काडतुसांसह अटक (Arrest) केली आहे. खून खटल्यात निर्दोष सुटल्यापासून सद्दामच्या टोळीने जळगाव ते भुसावळ रेल्वेस्थानकावर बऱ्यापैकी अवैध व्यवसाय कब्जात केला आहे.


(jalgaon city police areest criminals gun confiscated)

हेही वाचा: जळगाव शहरात सक्रिय रुग्ण हजाराच्या आत..पण मृत्यूने चिंता कामय

शहरातील रेल्वेस्टेशन परिसराला लागूनच असलेल्या खानदेश सेंट्रल आवारात एक अट्टल गुन्हेगार कंबरेला पिस्तूल लावून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील अक्रम शेख, भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, उमेश भांडरकर, किशोर निकुंभ, प्रणेश ठाकूर, गणेश पाटील, रतन गिते अशांनी रेल्वेस्थानक परिसर, गेंदालालमील आणि खानदेश सेंट्रल अशा वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अखेर रिक्षात दडून बसला असताना युनूस ऊर्फ सद्दाम सलिम पटेल (वय-३०) याला शिताफीने ताब्यात घेतले. युनीसची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कंबरेला पिस्तूल असल्याचे आढळून आले. पिस्तूल काढल्यावर त्यात तीन राऊंड लोड होते. पिस्तुलासह सद्दामला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.

टोळीसह खुनातील संशयित

शहरातील प्रजापतनगरात २३ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शकिल शेख इब्राहिम(वय ३०) हा तरुण शेतरस्त्याने बुलेटवर येत असताना त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून चॉपर, लोखंडी टायबर पट्टीसह इतर घातक शस्त्रानिशी पूर्वनियोजित हल्ला चढवून खून करण्यात आला होता. तालुका पोलिस ठाण्यात दाखल या खुनाच्या गुन्ह्यात शाहरुख ऊर्फ जुब्बा सलीम खाटीक, युनूस ऊर्फ सद्दाम सलीम पटेल, करण प्रकाश पवार, मुस्तफा मुबारक शेख, हर्षल वना महाजन, अशा पाच संशयितांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारपक्ष आणि तत्कालीन तपासाधिकारी संशयितांवरील गुन्हा सिध्द करु शकले नाही. संशयाचा फायदा म्हणून खून खटला निर्दोष सुटला होता. याच खटल्यात खुनशी सद्दाम ऊर्फ सलीमने नव्याने रेल्वेतील टोळी उभी केल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top