जळगाव शहरात सक्रिय रुग्ण हजाराच्या आत..पण मृत्यूने चिंता कामय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव शहरात सक्रिय रुग्ण हजाराच्या आत..पण मृत्यूने चिंता कामय

जळगाव शहरात सक्रिय रुग्ण हजाराच्या आत..पण मृत्यूने चिंता कामय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : महिनाभरापूर्वी शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये (Hospital) बेड मिळणेही शक्य होत नव्हते, त्या जळगाव शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात (Corona infection control) येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील तीन हजारांवर पोचलेली सक्रिय रुग्णसंख्या (Active patient) आता हजाराच्या आत आली आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू (Most deaths) जळगाव शहरात झाल्याने चिंता कायम आहे.

(jalgaon city corona infection control active patient numbers low)

हेही वाचा: पोटच्या मुलांनीच सोडली साथ; कोरोनातून बरी झाल्‍यानंतर घरी नेण्यास नकार

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्राप्रमाणे जळगाव जिल्हा सर्वाधिक प्रभावित ठरला. दुसरी लाट अमरावतीनंतर जळगाव जिल्ह्यातूनच सुरू झाल्याचे मानले जाते. फेब्रुवारी अखेरपासून सुरू झालेल्या या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात मार्च व एप्रिलमध्ये प्रचंड रुग्ण वाढले.

जळगाव शहर प्रभावित

पहिल्या लाटेप्रमाणेच या दुसऱ्या लाटेतही जळगाव शहर सर्वाधिक प्रभावित झाले. शहरात एकेका दिवसात दोन-तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. मार्च व एप्रिलमध्ये उद्‌भवलेली ही स्थिती एप्रिलच्या अखेरीस कमी होत गेली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात केळी, वांगीचे क्षेत्र वाढवा !

सक्रिय रुग्ण घटले

गेल्या १ मेपासून जिल्ह्यासह शहरातील रोजची रुग्णसंख्या कमी होऊ लागली. बरे होणारेही वाढले. त्यामुळे तीन हजारांवर पोचलेली शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता हजाराच्या आत आली आहे. गुरुवारी सक्रिय रुग्णसंख्या ८०४ होती. शहरात आतापर्यंत ३२ हजार ३७४ एकूण रुग्ण आढळून आले, त्यापैकी ३१ हजार १४ रुग्ण बरे झाले आहेत.

मृत्यू सर्वाधिक

एकीकडे बरे होणारे वाढून सक्रिय रुग्ण हजाराच्या आत आलेली असताना शहरातील मृत्यू मात्र चिंताजनक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत दोन हजार ४६० मृत्यू झाले असून, त्यापैकी जवळपास २० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे ५५६ मृत्यू एकट्या जळगाव शहरातील आहेत.

loading image
go to top