esakal | अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार दिलीप वाघांसह त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा 

बोलून बातमी शोधा

अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार दिलीप वाघांसह त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा }

वाळूठेका चालावा म्हणून रोज दहा हजार द्यावे किंवा आमचे दोन ट्रॅक्टर व एक डंपर चालू द्यावे अशी मागणी पूर्ण न केल्याने

jalgaon
अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार दिलीप वाघांसह त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : वाळूपावतीचे दर कमी करण्याच्या मागणीसह वाळू उपशाबाबत तक्रारी करणाऱ्या वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पाचोऱ्यात समोर आला आहे. याप्रकरणी माजी आमदार दिलीप वाघ व त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
याबाबत जखमी हरिभाऊ तुकाराम पाटील (वय ४५, रा. श्रीरामनगर, पाचोरा) यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांना जबाब दिला. 

त्यानुसार गेल्या बुधवारी (ता. ३) रात्री साडे नऊला भगवान मिस्‍त्री त्यांच्या घरी आले. माजी आमदार दिलीप वाघ यांचा मुलगा भूषण ऊर्फ सनीभाऊ याने बोलावल्याचे सांगितले. हरिभाऊ हे दुचाकीने मोंडाळा रस्त्यावर त्यांना भेटण्यासाठी गेले व दोघांची वाळू वाहतुकीच्या पावतीचा दर कमी करावा यावर चर्चा झाली. 

दरोडा अपहरणाचा गुन्हा 
हरिभाऊ पाटील यांच्या तक्रारीनुसार भूषण वाघ ऊर्फ सनी भाऊ, शुभम नाईक, ललित विनोद पाटील, महेश माळी आणि माजी आमदार दिलीप वाघ अशांच्या विरुद्ध अपहरणाचा (कलम ३६३, ३९५) गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक गणेश चौबे तपास करत आहेत. 


विरोधी तक्रारही दाखल 
महेश ऊर्फ बंटी सदाशीव माळी (वय ३६) या वाळू ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीत हरिभाऊ तुकाराम पाटील, सुनील प्रभाकर पाटील, हर्षल साळूंके, अशोक लखन मोरे, राहुल रामा पाटील, अविनाश लखन मोरे (सर्व रा. पाचोरा) यांच्याविरुद्ध दरोड्याचा (कलम ३९५, ३८५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूठेका चालावा म्हणून रोज दहा हजार द्यावे किंवा आमचे दोन ट्रॅक्टर व एक डंपर चालू द्यावे अशी मागणी पूर्ण न केल्याने ठेकेदार महेश पाटील यांच्या हातातील ३ लाख ८ हजार रुपये हिसकावून नेल्याचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे तपास करत आहेत.