महसूल पथकासह तीन महिलांना वाळू डंपरने चिरडण्याचा प्रयत्न 

महसूल पथकासह तीन महिलांना वाळू डंपरने चिरडण्याचा प्रयत्न 

Published on

यावल : अवैध गौण खनिज वाहतूकदार डंपरचालकाने गुरुवारी  रात्री पावणेदहाच्या सुमारास किनगाव येथे चौफुलीवर मंडळ अधिकारी, तलाठीसह तीन महिलांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न डंपरचालकाने केला. चालक डंपरसह कोळन्हावी रस्त्यावरून पसार होण्यात यशस्वी झाला असला तरी त्याच्या क्लीनरला पकडण्यात महसूल विभागाच्या पथकास यश आले आहे. तालुक्यात महसूल पथकावर हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. 

मंडळ अधिकारी सचिन जगताप व तलाठी टेमरसिंग बारेला किनगाव येथे चौफुलीवर पहारा करीत उभे असताना त्यांनी एका डंपरचालकास (एमएच २८ ७७०८) वाहन थांबविण्याची सूचना केली असता सदर डंपरचालकांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्नात त्यास महसूल पथक उभे असल्याचे दिसताच डंपरचालकाने वाहन तातडीने मागे घेण्याच्या प्रयत्नात तेथे उभ्या असलेल्या तीन महिलांसह, मंडळ अधिकारी व तलाठी यांना चिरडण्याचा प्रयत्न करून वाहन भरधाव वेगात कोळन्हावी गावाचे दिशेने पळवून नेले. मात्र डंपरवरील क्लीनर अमोल सपकाळे (रा. आव्हाणे) यास महसूल पथकाने ताब्यात घेतले असून त्यास येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आणले. तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com