सातपुडा जगंलात घडली थरारक घटना ; परप्रांतीय शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकावर केला गोळीबार

सातपुडा जगंलात घडली थरारक घटना ; परप्रांतीय शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकावर केला गोळीबार

यावल: तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय 10ते 15 जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबत येथील पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहीती अशी की, तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या करंजपाणी या परिमंडल कक्ष क्र. 103व 104मध्ये 11एप्रिलला दुपारी 3.40 वाजेच्या सुमारास या क्षेत्राकरीता वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय गोरख शिरसाठ हे आपले सहकारी लेदा सिताराम पावरा , काळु बाळु पवार वनरक्षक लंगडाआंबा, अश्रफ मुराद तडवी , वनरक्षक करंजपाणी असे सर्व मिळुन एकत्र आम्ही लंगडा आंबा क्षेत्रात गस्त करीत असतांना त्या ठिकाणी 10ते 15 अज्ञात जणांचे टोळके दिसुन आले. व त्या टोळक्यातील लोकांनी पथकाकडे पाहून घटनास्थळापासुन पळ काढला.

गावठी कट्याने गोळीबार

वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता, टोळक्यांकडे असलेल्या गावठी कट्टयाने झाडाच्या मागे लपून आम्हाला शिकार करू देत नाही असे जोरा जाराने ओरडुन वनविभागाच्या पथकाच्या दिशेने दोन वेळा गोळीबार केला. त्यानंतर जंगलच्या मार्गाने परप्रांतात पळुन जाण्यात यशस्वी झाले.

ना शस्त्र, ना मोबाईल रेंज

वनविभागाच्या पथकाजवळ कोणतेच शस्त्र नसल्याने झाडाच्या मागे लपून त्यांनी आपला जीव वाचविला. तसेच मोबाईलला रेंज देखील नसल्याने कुणाशीही संपर्क करता आला नाही. काही अंतरावर असलेल्या शेणपाणी सरंक्षणकुटी जावुन फॉरेस्ट रेंजर अक्षय म्हात्रे यांच्याशी तत्काळ दुरध्वनीव्दारे कळविले. त्लंयानंतर गडाआंबा मुख्यालयात वनविभागाचे पथक गेले. पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील ,पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस अमलदार सुशिल घुगे , भुषण चव्हाण ,असलम खान हे करीत असुन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक तपासकामी करंजपाणी या घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com