हळदीचा कार्यक्रमात तलवार घेऊन नाचला; आणि सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात   

रईस शेख
Sunday, 20 December 2020

काही दिवसांपूर्वी लग्नातील हळदीच्या डीजेच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचणारा सराईत गुन्हेगाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. हा सराईत गुन्हेगार तलवार घेवून दहशत माजवित असतांना पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

जळगावची महत्वाची बातमी- सुडाच्या राजकारणावर खडसे काय म्‍हणाले; महाजनांच्या आरोपावरील उत्‍तर वाचा

जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगरातील प्रमोद इंगळे हा काही दिवसांपूर्वी लग्नातील हळदीच्या डीजेच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बाजारपट्यात तलवार घेवून दहशत 

शनिवारी (ता. १९) प्रमोद इंगळे (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) हा सकाळच्या सुमारास हातात तलवार घेऊन बाजारपट्ट्याजवळ आरडाओरड करून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पंकज शिंदे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना देताच त्यांनी प्रदीप पाटील, गोरखनाथ बागूल, महेश महाजन, विजय पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले.

आवश्य वाचा- तरसोद फाट्याजवळ होणार उड्डाणपूल 

 तलवारसह अटक

पोलिसांच्या पथकाने प्रमोद इंगळेला अटक करीत त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीची धारदार तलवार हस्तगत केली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news jalgaon police arrested criminal