पोलिसांचा अजब कारभार : आजार बेंबीला अन्‌ मलम शेंडीला

जिल्‍हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने रात्री शार्प दहाला आस्थापना बंदचे पालन चार महिन्यांपासून सुरू आहे.
Jalgaon crime news
Jalgaon crime news esakal

जळगाव : जिल्‍हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने रात्री शार्प दहाला आस्थापना बंदचे पालन चार महिन्यांपासून सुरू आहे. असे असतानाही एकामागून एक तीन खुनाच्या घटना घडल्या असून, चाकूहल्ले नित्याचेच झाले आहेत. शिवाजीनगर, गेंदालाल मिल, शनिपेठ, कांचननगर, शाहूनगरसह सर्वच शहरांतील गुन्हेगारांचे आश्रयस्थान जळगाव रेल्वेस्थानक मात्र आहे तशाच परिस्थितीत सुरू असल्याने गुन्हेगारांचा उपद्रव मात्र थांबलेला नाही. (Latest Marathi News)

जळगाव शहरात दारू पाजून खुनाच्या जवळपास सात घटना सहा महिन्यांत घडल्या आहेत. सततच्या खुनाच्या घटनांना आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शहरातील आस्थापना रात्री दहालाच बंद करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी सहा-सातला दुकान लावणारे पाणीपुरी, भेळ, पावभाजी, आइस्क्रीम विक्रेत्यांना दहाच्या काट्यावरच दुकान बंद करावे लागते अन्यथा एरवी गुन्हेगारांचे मित्र असलेले कर्तबगार पोलिस काठ्यांनी झोडपून काढतात.

Jalgaon crime news
शिंदे -फडणवीस रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात - नाना पटोले

संपूर्ण शहर बंद तरी...

रात्री दहालाच शहरातील व्यवहार बंद होतात. गेल्या चार महिन्यांतील क्राइम रेट कमी झाल्याचा तोर्रा पोलिस दलाकडून मिरविला जात असला, तरी हे सत्य मुळीच नाही. कारण खुनाच्या घटना मुळीच थांबलेल्या नाहीत. शाहूनगर जळकी मिल परिसरात भरदिवसा, तर दोन दिवसांनंतर हरिविठ्ठलनगरात सायंकाळी खुनाचा थरार घडला. अर्थात प्रत्येक पोलिस ठाणे आपल्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रित आणण्यात असमर्थ असल्याचेच हे द्योतक मानले जात आहे.

दारूगुत्ते अन्‌ वाइन शॉप

गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या सात खुनाच्या घटना आणि १३ प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यांत दारूच केंद्रस्थानी होती. परिणामी रस्त्यावरील चालतेबोलते मयखाने असलेल्या अंडा लॉरीज‌ आणि वाइन शॉप, बियर बार वेळेत बंद होणे अपेक्षित होते. पोलिसांच्या दहाच्या वेळेमुळे झाले मात्र विपरीत. वाइन शॉप, बियर बारला रात्री उशिरापर्यंत परवानगी आहे. लिकर लॉबीने मंत्रालयातून पारित केलेल्या वेळापत्रकासह आपला धंदा सुरक्षित करून घेतला.

Jalgaon crime news
सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील पासपोर्ट कार्यालयातील कामं ठप्प; नागरिक हैराण

अर्थात वाइन शॉपवरून दारूचे पार्सल घेऊन दारुडे आता सार्वजनिक ठिकाणांवर मैफल जमवू लागले आहे. त्यासाठी लागणारी सिगारेट, चखना, ऑम्लेट पुरविण्यासाठी जळगाव रेल्वेस्थानक रात्रंदिवस सुरूच आहे.

स्थानकच गुन्हेगारांचे जंक्शन

जळगाव रेल्वेस्थानक परिसरात रात्रभर चहा, पोहे, अंडापाव, सिगारेट, गुटखा, गर्द, गांजा, बियर, दारू उपलब्ध असणारे ठिकाण आहे. याच परिसरात गुटखा, सिगारेट, गांजाच्या पुड्या व खाद्यपदार्थ मिळतात. बियर-क्वार्टर ब्लॅकने देणारेही येथेच घुटमळतात. तर, रेल्वेस्थानकाच्या मागे गेंदालाल मिल भागात गल्लोगल्ली दारू विक्री होत असल्याचे जळकी मिल खुनाच्या घटनेत समोर आले.

‘नो-हॉकर्स झोन’चा प्रस्ताव धूळखात

रेल्वेस्थानकामुळे गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असल्याने शहर पोलिस ठाणे आणि जिल्‍हा पोलिस दलातर्फे रेल्वेस्थानक परिसर हे ‘नो-हॉकर्स झोन’ म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव वर्षभरात चार वेळा

देण्यात आला आहे. यावर महापालिकेने निर्णय घेतलेला नसून राजकीय पदाधिकारी, नगरसेवकांचे हितसंबंध असल्याने त्यावर निर्णय होणेही अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

Jalgaon crime news
मुलाच्या आत्महत्येनंतर मिळाले पैसे; पैशांसाठी लहान मुलाने केली वडिलांची हत्या

दारू पार्सलसह खुनाच्या घटना

- गोलाणी मार्केट : १६ मे २०२२ ः मुकेश रमेश राजपूत (वय ३२)

- रेल्वे मालधक्का : २५ मे २०२२ ः अनिकेत गणेश गायकवाड (२९)

- कासमवाडी बाजार : ३ जून २०२२ ः सागर वासुदेव पाटील (२७)

- शाहूनगर जळकी मिल : २० जुलै २०२२ ः रहीम शहा ऊर्फ रमा (३०)

- हरिविठ्ठलनगर बाजार चौक : २३ जुलै २०२२ दिनेश काशीनाथ भोई (३२)

या सर्व खुनाच्या घटनांमध्ये मारेकऱ्यांनी कुठल्यातरी वाइन शॉपमधून दारूचे पार्सल खरेदी केले. नंतर, सार्वजनिक निर्मनुष्य ठिकाण गाठून तिथे मैफल जमविली यथेच्छ दारू ढोसल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची घटना घडली.

Jalgaon crime news
तंबाखू सिगारेटच्या पाकिटांवर आता नवा इशारा; हेल्पलाईन नंबरही देणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com