Jalgaon Crime : पिस्तूल विकायला आलेला भामटा अटकेत

Golu Singh Dilip Singh Bhatia with Pistol
Golu Singh Dilip Singh Bhatia with Pistolesakal
Updated on

जळगाव : मध्य प्रदेशातील बहेरामपुरा (जि. खरगोन) येथील पिस्तूल विक्रेत्यास गुन्हे शाखेच्या पथकाने यावल बसस्थानकावर अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून विक्रीसाठी आणलेल्या पिस्तुलासह दुचाकी ताब्यात घेण्यात आली असून, यावल पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गोलूसिंग दिलीपसिंग भाटिया(वय २८, रा. शिनगूर, पो. बेहरामपुरा, खरगोन) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तपासात महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. (criminal who came to sell pistol arrested Jalgaon Crime Latest Marathi News)

Golu Singh Dilip Singh Bhatia with Pistol
Nandurbar : मुलीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी झगडतोय बाप!

सातपुडा पर्वतामधून दुर्गम दऱ्याखोऱ्यांसह मध्य प्रदेशातील काही सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर गावठी पिस्तूल महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्या जातात. सोमवारी (ता. १२) असाच एक विक्रेता पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.

त्यांच्या पथकातील सुनील दामोदरे, दीपक पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान तुकाराम पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी या पथकाने यावल बसस्थानक परिसरासह इतर दोन ठिकाणी सापळा रचला.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार होंडा शाइन (एमएच १०, एनजी ९४०) या दुचाकीवर चोपडाकडून अडावदच्या दिशेने जाणाऱ्या तरुणाला पथकाने थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या कंबरेला एक गावठी पिस्तूल मिळून आले आहे. पिस्तुलासह त्याची दुचाकी जप्त करून त्याला ताब्यात घेतल्यावर यावल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Golu Singh Dilip Singh Bhatia with Pistol
Nashik : वाट चुकलेल्या महिलेची पोलिसांकडून मूळ गावी रवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com