Nandurbar : मुलीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी झगडतोय बाप!

The girl's father and villagers show the field where the girl's body was buried in Salt.
The girl's father and villagers show the field where the girl's body was buried in Salt.esakal

नंदुरबार : खडक्या (ता. धडगाव) येथे विवाहित मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली असून, तिला आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न झालेला आहे. मुलीच्या बापाने याबाबत पोलिसांना सांगूनही तिचे शवविच्छेदन दूरच, केवळ आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आला.

पोलिसांनी लक्ष न दिल्याने मुलीला न्याय मिळावा यासाठी पालकांनी तब्बल ४२ दिवसांपासून तिचा मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला आहे. मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्यात यावे, तसेच जोपर्यंत संबंधित दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा पालकांसह ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, या प्रकाराला तब्बल ४२ दिवसांनी वाचा फुटल्याने पोलिसांनी सारवासराव करत तीन संशयितांना अटक केली आहे. (Father fighting for justice after daughter death due to gang rape in Nandurbar Crime News)

खडक्या येथील विवाहित मुलीला वावी (ता. धडगाव) येथील रहिवासी व अन्य एकाने गेल्या १ ऑगस्ट २०२२ ला बळजबरी गाडीवर बसवून पळवून नेले. त्यानंतर पीडित विवाहितेने तिच्या नातलगांना सांगितले, की वावी येथे रणजित ठाकरेसह चार जणांनी तिच्यावर अत्याचार केला असून, ते मला मारून टाकतील, असे सांगत घटनास्थळाचे फोटोही विवाहितेने नातेवाइकांना पाठविले होते. त्यानंतर तिचे कुटुंबीय वावी येथे गेले असता विवाहिता आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली.

वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह आंब्याच्या झाडावरून खाली उतरविण्यात आला, असे तिच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे. पीडितेवर बलात्कार झाल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगूनदेखील तिच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झालेली आढळून आली नाही.

आंब्याचे झाड उंच असून, त्या ठिकाणी विवाहिता कशी चढू शकते, असा प्रश्‍न कुटुंबीयांनी उपस्थित केला. तसेच विवाहितेच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या क्लिपबाबतही पोलिसांनी फारशी गांभीर्याने दखल घेतलेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत पोलिसांनी सुरवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. वावी येथील रणजित ठाकरेसह तिघांना अटक केली आहे. त्या मुलीचा मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यसंस्कारासाठी सोपविण्यात आला होता.

The girl's father and villagers show the field where the girl's body was buried in Salt.
अंबडच्या दत्तनगरमध्ये गुंडांचा धिंगाणा; रहिवाशांच्या घरांवर दगडफेक, Video Viral

मात्र मुलीच्या पित्याने जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत घराशेजारच्या शेतात खड्डा करून मुलीचा मृतदेह मिठामध्ये पुरून ठेवला आहे. त्यानंतर कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलिस ठाण्यासह थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर पीडित युवतीचे पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचना धडगाव पोलिसांना दिल्या.

"पीडितेच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तपासणी करण्यात येत आहे. यात काही तथ्य आढळल्यास वाढीव कलमे लावण्यात येतील. याबाबत धडगाव येथील तहसीलदारांशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे."

-श्रीकांत घुमरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शहादा

"माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली नसून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केलेला आहे. त्यानंतर झाडावर लटकविण्यात आले आहे. तिला न्याय मिळण्यासाठी तिचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, जोपर्यंत पुन्हा शवविच्छेदन होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही." - पीडितेचे वडील.

The girl's father and villagers show the field where the girl's body was buried in Salt.
Crime Update : परप्रांतियांच्या गुंडागिरीने अंबडचे दत्तनगर बनतेय UP-Bihar!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com