जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्येतील घट कायम; संख्या दोनशेच्या आत !

गेल्या २४ तासांत जळगाव शहरातील दोघांसह जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला
COVID
COVIDCOVID


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (corona) दुसऱ्या लाटेतील (corona second wave) संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. महिनाभरापासून सुरु असलेली नव्या रुग्णसंख्येतील घट कायम आहे. गुरुवारी या लाटेतील सर्वांत कमी म्हणजे १९४ रुग्णांची नोंद झाली, तर २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू (corona death) झाला. (corona patients number in jalgaon district is low)

COVID
कोविड, म्युकरमायकोसिसससाठी ४० तज्ज्ञांची टास्क फोर्स !

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १ मेपासून सातत्याने नव्या बाधितांमध्ये घट होऊन बरे होणाऱ्यांचा आकडा वाढत राहिला. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता सहा हजारांच्या टप्प्यात आली आहे. गुरुवारी प्राप्त ७ हजारांवर चाचण्यांच्या अहवालात १९४ नवे बाधित समोर आले. एकूण रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार ३३१ झाली. तर २१९ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३० हजार २७६वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत जळगाव शहरातील दोघांसह जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५१६ एवढा आहे.


गंभीर रुग्ण हजाराच्या आत
दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण तुलनेने पहिल्या लाटेपेक्षा अधिक होते. सद्य:स्थितीत सक्रिय ६ हजार ५३९ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ५ हजार ३३९ तर लक्षणे असलेले १२०९ रुग्ण आहेत. त्यात ऑक्सिजनवरील ६१५ व ल आयसीयूतील ३४७ असे एकूण ९६२ रुग्ण गंभीर आहेत.

COVID
पन्नास दिवसानंतर आजीने धरली घरची वाट..!

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर २२, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ १५, चोपडा ११, पाचोरा ५, भडगाव १, धरणगाव ५, यावल २१, एरंडोल ७, जामनेर १३, रावेर २०, पारोळा २, चाळीसगाव ३४, मुक्ताईनगर ५, बोदवड १३, अन्य जिल्ह्यातील ७. हॉटस्पॉट ठरलेल्या अमळनेर तालुक्यात गुरुवारी एकाही नवीन रुग्णाची नोंद नाही.
(corona patients number in jalgaon district is low)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com