esakal | पन्नास दिवसानंतर आजीने धरली घरची वाट..!
sakal

बोलून बातमी शोधा

पन्नास दिवसानंतर आजीने धरली घरची वाट..!

पन्नास दिवसानंतर आजीने धरली घरची वाट..!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमळनेर : कोरोनाची (corona) लाट काही प्रमाणात ओसरायला लागली आहे तशी आता सकारात्मकता देखील निर्माण व्हायला लागली आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालय (covid Hospital) (DCHC)च्या संपूर्ण टीम च्या अथक प्रयत्नाने मांडळ येथील राजकोरबाई कोळी यांनी 50 दिवस रुग्णायलात घालवल्यानंतर,कोरोनावर यशस्वीपणे मात (corona free) करून त्या घरी परतल्या आहेत. (fifty-year-old grandmother corona free and go to home)

हेही वाचा: बनावट शिक्‍के अन्‌ खोट्या सह्या..वाळूठकेदाराचा उपद्व्याप


कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना धुळे येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मात्र तब्बल 19 दिवसानंतर देखील त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती,त्यातच तब्बेत खालावत असतांना,व खाजगी हॉस्पिटल मधील खर्च परवडणारा नव्हता यामुळे राजकोरबाई यांच्या नातेवाइकांनी त्यांना 26 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय अमळनेर (Rural Hospital Amalner) येथे दाखल केले.


प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताळे,डॉ.आशिष पाटील,डॉ.शेख महेमुद यांच्या मार्गदर्शनाखाली आजींनी 31 दिवस ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना 27 मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आजींच्या सकारात्मक विचारांनी व डॉक्टरांच्या मेहनतीच्या बळावर कोळी यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.यावेळी सुवार्ता वळवी,महिरास सोनाली,राजश्री पाटील,गायकवाड माधवी या परिचारिका देखील उपस्थित होत्या.
हेही वाचा: स्वखर्चाने जलवाहिनी टाकून पाणीटंचाईवर मात

ऑक्सिजनची लेव्हल फक्त 38

ग्रामीण रुग्णालयात कोळी यांना दाखल केले त्यावेळी त्यांचा सामान्य ऑक्सिजन स्तर फक्त 38 होता,तर ऑक्सिजन लावून 86 पर्यंत होता.परंतु डिस्चार्ज च्या वेळी त्यांचा सामान्य ऑक्सिजन स्तर 95 पर्यंत होता हे विशेष.

(fifty-year-old grandmother corona free and go to home)