Latest Marathi News | सीएसटी- दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Information News

Jalgaon News : सीएसटी- दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार

धरणगाव : रेल्वे प्रशासनाने नव्याने सुरू केलेली मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस ही गाडी आता भुसावळपर्यंत धावणार असल्याची माहिती प्रवाशी मंडळाने दिली. यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी प्रयत्न केला.

खानदेशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता भाजप धरणगाव, धरणगाव तालुका प्रवासी मंडळ, धरणगाव रेल्वे सल्लागार समिती व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती व DRUCC मेंबर यांनी मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस ही गाडी भुसावळपर्यंत चालवावी यासाठी खासदार उन्मेश पाटील यांना निवेदन देत पाठपुरावा केला. (CST Dondaicha Express Now Run till Bhusawal Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड

खानदेशाच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नवीन हंगामी प्रवाशी रेल्वे ९ जानेवारीपासुन ३१ मार्चपर्यत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. ही गाडी रविवार, मंगळवार व शुक्रवारी रात्री ११.५५ मिनिटांनी मुंबई सेंट्रल येथून सुटेल.

प्रवासादरम्यान बोरीवली, बोईसर, वापी, बलसाड, नवसारी, चलथान, बेस्तान बिने, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव येथे थांबून दुपारी बाराला भुसावळ येथे पोहोचेल. सोमवार, बुधवार व शनिवारी ही रेल्वे भुसावळ येथून सुटेल. या गाडीला प्रचंड मागणी असलेल्या बोईसर, वापी येथे थांबा देण्यात आलेला आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik Crime News : गावठी कट्ट्याने मारून केली दुखापत; दोघा संशयितांना अटक

यासंदर्भात खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला.

त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वरील प्रमाणे आदेश देत ही गाडी आता भुसावळपर्यत नेण्यात येणार आहे. या गाडीचा धरणगाव, एरंडोल, चोपडा, पारोळा तालुक्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी फायदा होईल. संपूर्ण खानदेशातील नागरिक व प्रवासी मंडळातर्फे या गाडीचे आणि रेल्वे प्रशासनाचे स्वागत होत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : जिल्ह्यातील नववर्षातील सर्वात मोठी कारवाई; 41 जनावरांची सुटका

टॅग्स :Jalgaoncentral railway