Jalgaon Robbery News : जळगावात मध्यरात्री सशस्त्र धाडसी दरोडा; रोकड, दागिन्यांसह दुचाकी चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery News

Jalgaon Robbery News : जळगावात मध्यरात्री सशस्त्र धाडसी दरोडा; रोकड, दागिन्यांसह दुचाकी चोरीस

जळगाव : शहरातील ढाके कॉलनीत गुरुवारी (ता. २) मध्यरात्री दरोडेखोरांनी हातात शस्त्र घेत, कुटुंबाला धमकावत घरातून ५० हजारांची रोकड, सोन्याची चेन आणि दुचाकी घेऊन पसार झाल्याची थरारक घटना घडली.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (Daring armed robbery midnight in Jalgaon Thrilling events in Dhaka Colony Stolen bike cash and jewellery Jalgaon Crime News)

प्रमोद विठ्ठल घाडगे (वय ५९) पत्नी व मुलासह ढाके कॉलनीत वास्तव्यास आहेत. वडील व मुलगा कुरिअरचा व्यवसाय करतात. गुरुवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच सशस्त्र दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले.

चाकू, कुऱ्हाड व लाकडे त्यांच्या हातात होती. त्यापैकी खालच्या खोलीत झोपलेले प्रमोद घाडगे व त्यांच्या पत्नी या दोघांना दररोडेखोराने पैसे कुठे आहेत, अशी विचारणा केली. तसेच घरात कोण कोण आहे, हेही विचारले. घाडगे यांनी मुलगा वरच्या खोलीत झोपला आहे, असे सांगितल्यावर तीन दरोडेखोर वरच्या खोलीत गेले व मुलाची कॉलर पकडून त्यालाही खाली घेऊन आले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

रोकडसह ऐवज लंपास

यानंतर तिघांना खाली बसून दरोडेखोर पुन्हा वर गेले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी ५० हजारांची रोकड, तसेच प्रमोद घाडगे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी घाडगे यांच्या दुचाकीची चावी घेतली, तसेच बाहेर अंगणात हातातील लाकडे फेकून घाडगे यांची सोबत घेत त्या दुचाकीवरून पोबारा गेला. या घटनेनंतर घाडगे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.