Jalgaon News : गिरणापात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

बेसुमार वाळूउपशामुळे गिरणापात्रात निर्माण झालेल्या कृत्रीम डोहात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला.
drowing death
drowing deathesakal

Jalgaon News : बेसुमार वाळूउपशामुळे गिरणापात्रात निर्माण झालेल्या कृत्रीम डोहात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला.

सायंकाळी कामावरून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मंगल इघन बाविस्कर (वय ३२, रा. बोरनार, ता. जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. (Death of young man by drowning in girna river jalgaon news)

दोन दिवसांनंतर बुधवार (ता. २०) सायंकाळी मृतदेह सापडला. तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोरनार येथील मंगल बाविस्कर हा तरुण मजुरीची कामे करत होता. सोमवार (ता. १८) सकाळी तो कामावर गेला होता.

गिरणा नदीपात्रात सध्या हिवाळ्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने नदी बऱ्यापैकी वाहती झाली आहे. सोमवारी सायंकाळी मंगल घरी परतत असताना गिरणापात्रातील नेहमीच्या पायवाटेने नदी ओलांडत असताना पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला.

drowing death
Jalgaon News: पिंप्राळ्यात लवकरच भव्य दीक्षाभूमीची निर्मिती; माजी महापौरांची प्रकाश आंबेडकरांशी चर्चा

घडला प्रकार लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली, काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, दोन दिवस मृतदेह हाती लागला नाही. आजअखेर बुधवारी सायंकाळी पाचला त्याचा मृतदेह सापडला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तो नेण्यात आला. मयताच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

drowing death
Jalgaon News: योजनेपासून वंचित ठेवल्याची चौकशी करा; आमदार भोळेंची मंत्री भुजबळांकडे तक्रार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com