जळगाव : माता-बालमृत्यूच्या दरात घट

दोन वर्षांत दोन हजारांवर सीझेरियन; ग्रामीण रुग्णालये झाली अत्याधुनिक
Decrease in Mother and child mortality rate
Decrease in Mother and child mortality rate sakal

जळगाव : जिल्ह्यातील (Jalgaon District) ११ ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालयांत (Sub-district hospital) गेल्या दोन वर्षांत दोन हजारांवर सीझेरियन झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील माता-बालमृत्यूचे (Child mortality) प्रमाण कमालीचे घटले आहे. तीन वर्षांपासून या रुग्णालयांतील सेवांचा दर्जा सुधारला असून, ही रुग्णालये आता रुग्णांना आपलीशी वाटू लागली आहेत.

Decrease in Mother and child mortality rate
अकोला : गारपिटीने झोडपले; वीज कोसळल्याने एक ठार

जिल्ह्यातील ग्रामीण भागात दोन-तीन वर्षांपूर्वी महिलांवर शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्याच्या शस्त्रक्रियेची सोय (सीझेरियन) नव्हती. एवढेच नाही तर ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमधील सेवांचा दर्जा पाहता रुग्ण, त्यांचे नातेवाईक तेथे प्रसूतीसाठी दाखल होण्यासही नकार देत होते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील सर्व ११ ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालयांतील रुग्ण सेवांचा दर्जा सुधारला आहे. तेथे साध्या प्रसूतींवर तर लक्ष दिले जातेच, सोबत ज्या महिलांवर शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालावे लागते, अशा सीझेरियनच्या शस्त्रक्रियाही सुखरूप होत आहेत.

Decrease in Mother and child mortality rate
औरंगाबाद : आधी होता विषारी धूर, आता तयार होतोय गॅस

ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात पूर्वीपासून नैसर्गिक प्रसूतीची सोय आहे. मात्र, ज्या महिलांवर सीझर करून प्रसूत करावे लागत होते त्यांना जळगावला आणताना वाटेत दुर्दैवी घटना घडत होत्या. कारण संबंधित ग्रामीण रुग्णालय ते जिल्हा रुग्णालय यातील अंतर जास्त होते व वेळही अधिक लागत होता. यामुळे माता किंवा बाळाचा मृत्यू वेळप्रसंगी वेळेत उपचार न मिळाल्याने दोघांचा मृत्यू होत असे. आता सीझरच्या शस्त्रक्रियेची सोय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात केली असल्याने तेथेच सीझर होतात. यामुळे माता व बाळावर वेळीच उपचार करून सुखरूप सीझेरियन होत आहे.

Decrease in Mother and child mortality rate
औरंगाबाद मध्ये आता घरी जाऊन लस!

"जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात आता नैसर्गिक प्रसूतीसह सीझेरियनही होत आहेत. यामुळे मातेला जर सीझेरियनची गरज भासली तर तेथेच अत्याधुनिक यंत्रणेमुळे, तज्ज्ञ डॉक्टरांमुळे सीझेरियन केल्या जातात. याचा परिणाम गेल्या दोन-तीन वर्षांतील माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे."

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शस्त्रचिकित्सक, जळगाव

आकडे बोलतात

वर्ष - नैसर्गिक प्रसूती - सीझेरियनच्या केसेस

  • २०१८-१९ - ८२२७ - ७६५

  • २०१९-२० - ८५५४ - ८१५

  • २०२०-२१ - ५७७६ - ५८६

  • एकूण २२ हजार ५६७ २ हजार १६६

मृत्यूचे कमी झालेले प्रमाण असे

  • वर्ष- बालमृत्यू दर - मातामृत्यू दर

  • २०१८-१९ - ६.८८ - ४६

  • २०१९-२० - ५.९४ - ४३

  • २०२०-२१ - ५.८१ - ३९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com