अंगणात चिठ्ठी टाकून खंडणीची मागणी; 2 वाहने पेटवली

Burned Car
Burned Caresakal

जळगाव : निमखेडी शिवारातील साई विहार कॉलनीत एका गृहस्थाच्या अंगणात दहा लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागणारी चिठ्ठी टाकून नंतर दोन्ही कार जाळून टाकण्यात (CAr Burned) आल्या. तुझी पत्नी व मुलांचा जीव प्रिय असेल, तर पोलिसांना न सांगता दहा लाख आणून दे, अन्यथा तुझ्या डोळ्यादेखत त्यांची हत्या (Murder) करण्याची धमकी देण्यात आली. (Demand ransom by throwing lots in yard 2 vehicles set on fire Jalgaon Crime news)

निमखेडी शिवारातील साई विहार कॉलनीत हरीश वसंतराव वरुळकर व आनंद युवराज पाटील या दोघांच्या कार माथेफिरूने पेटविल्या असून, धमकी देणारे पत्र असलेला लिफाफा सापडला आहे. हरीश वरुळकर एका खासगी कृषी कंपनीत नोकरीस आहेत. आनंद पाटील यांचे हॉटेल आहे. बुधवारी मध्यरात्री वरुळकर यांची वॅगनार (एमएच २०, डीजे ७३१६) व पाटील यांची सुझुकी बलेनो (एमएच १९, सीझेड ४४३०) घराबाहेर उभ्या होत्या. पहाटे तीनच्या सुमारास माथेफिरुने या दोन्ही कारवर पेट्रोल टाकून आग लावली. आगीचे लोट उठताच रहिवाशांना जाग आल्याने ही घटना लक्षात आली. तोपर्यंत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Burned Car
सुसाट ट्रकने दोन पिक-अप व्हॅन चिरडल्या; चौघांचा मृत्यू, 14 जखमी

धमकीपत्र

आग विझविल्यानंतर वरुळकर व पाटील यांच्या अंगणात एक पत्र मिळून आले. त्यात तोडक्या मोडक्या हिंदीतून स्पष्टपणे धमकी देणारा मजकूर लिहिला आहे. दोन दिवसांत १० लाख रुपये दिले नाही, तर पत्नीसह मुलांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. घाबरविण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या पत्राखाली सुलतान भाई, गब्बर गँग, असे नमूद केले आहे. कार पेटवून देणे हा ट्रेलर असून, दहा लाख न देता पोलिसांत तक्रार दिल्यास डेाळ्यादेखत पत्नी व मुलांची हत्या करू, असाही उल्लेख आहे. याबाबत वरुळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Burned Car
Jalgaon : 2 चिमुकल्यांसह आईचा पाण्यात बुडून मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com