Latest Marathi News | पत्नी विरहातून नैराश्यग्रस्त पतीने मृत्युला कवटाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon News : पत्नी विरहातून नैराश्यग्रस्त पतीने मृत्युला कवटाळले

जळगाव : शहरातील तानाजी मालुसरे नगरातील देविदास भावराव कोळी (वय ३५) या गृहस्थाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाच्या खिशातील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नैराश्यातून देविदास यांनी जीवनयात्रा संपविल्याचे सांगण्यात आले.

शहरातील आसोदा रोडवरील तानाजी मालुसरे नगरात देविदास कोळी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. त्यांना तीन मुली एक मुलगा असा परिवार असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ते घरातून आपल्या दुचाकीने निघून गेले होते. (Depressed husband due to estrangement from his wife committed suicide Jalgaon Crime News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Jalgaon News : राज्यात दरवर्षी 4 लाख नागरिक होतात ज्येष्ठ ; FSCOMचा मोठा आधार

मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी आसोदा रेल्वे गेटजवळ दुचाकी लावून त्यांनी जळगाव-भादली रेल्वेलाईन खांबा क्र. ४२२ जवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मयताच्या अंगझडतीत पँटच्या खिशात पाकिट सापडले.

त्यावरुन त्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांना मृत तरूणाची आसोदा रेल्वे गेटजवळ दुचाकी सुद्धा मिळून आली. ओळख पटल्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर मृतदेह ओळखला. शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर देविदास कोळी तणावात होते, नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असे, परिचीतांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले.

हेही वाचा: District Milk Union : खडसेंना सावधानतेचा इशारा, महाजन-पाटलांना ऊर्जा!