Jalgaon News : 10 तांड्यांमध्ये होणार 1 कोटींची विकासकामे

Guardian Minister Gulabrao Patil speaking
Guardian Minister Gulabrao Patil speakingesakal

Jalgaon News : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील ९ तांड्यामध्ये तर धरणगाव तालुक्यातील एका तांडा वस्तीत अश्या १० तांडा वस्तीत विविध विकास कामांसाठी १ कोटीच्या कामांना प्रशासकीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. (Development works worth 1 crore will be done in 10 habitation jalgaon news)

यासाठी शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निधीही वितरीत करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण होत आहे. यामुळे तांडा वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Guardian Minister Gulabrao Patil speaking
Jalgaon News: ‘टॉवर चौक’ वाहतूक सुरक्षा मॉडेल; नियम मोडल्यास कॅमेऱ्याद्वारे दंड

वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजने अंतर्गत जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे, रामदेववाडी येथे सभामडप बांधकाम करणे, म्हसावद येथील हटकर/ धनगर वस्तीत सभामंडप बांधकाम करणे, धानवड तांडा येथे सभामंडप बांधकाम करणे, वसंतवाडी तांडा येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, मोहाडी येथील बंजारा वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवणे, विटनेर येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, लमांजन येथील हटकर / धनगर वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवणे, कुऱ्हाळदे तांडा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे अशा सर्वकामांसाठी एकूण १ कोटीच्या विविध विकास कामांसाठी शासनाने प्रशाकीय मान्यता दिली आहे.

Guardian Minister Gulabrao Patil speaking
Jalgaon News : प्रदूषणात महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाची भर; धुळीचा त्रास अन् वाहतुकीचा खोळंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com