Dhule: जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Suicide

धुळे जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यात दोघांनी आत्महत्या केल्या, तर एकास चक्कर आल्याने विहिरीत पडून अंत झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. शेतकरी राजेंद्र नानासाहेब महाले (वय २८, रा. हातनूर, ता. शिंदखेडा) याने बुधवारी (ता. १०) घरी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्याला ग्रामस्थ सुदाम पाटील व इतरांनी चिमठाणे आरोग्य केंद्रात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

दुसऱ्या घटनेत शेतकरी राकेश मानसिंग राजपूत (२०, रा. तरवाडे, ता. धुळे) बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला. मात्र, तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे काका शेतात शोधासाठी गेले. तेव्हा राकेश शेतातील पाटाच्या बाजूला असलेल्या जांभळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भामरे (ता. साक्री) येथील शेतकरी यशवंत फकिरा गवळे (४०) सोमवारी (ता. ८) शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले. चक्कर आल्याने ते विहिरीत पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

loading image
go to top