esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

 महापालिका

धुळे : दीड महिन्यात १४ कोटींच्या कामांना ‘वर्क ऑर्डर’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देताना महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याची कारणे पुढे केली जातात. दुसरीकडे मात्र कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर होतात हेदेखील लक्षात घेण्याजोगे आहे. गेल्या दीड महिन्यातच महापालिकेने तब्बल सुमारे १४ कोटी रुपयांच्या कामांना कार्यादेश दिले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व कामे महापालिका आयुक्तांना असलेल्या २५ लाखांपर्यंत खर्च मंजुरीच्या अधिकारातील आहेत.

धुळे शहरात सद्यःस्थितीत व यापूर्वीही मूलभूत सोयी-सुविधांसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत असतात. या तक्रारी लक्षात घेता शहरात इतर विकासाची कामे दूरच, नागरिकांना नागरी सोयी-सुविधादेखील मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. या कामांसाठी जाणाऱ्या नागरिक, संस्था, नगरसेवकांना महापालिकेची तिजोरी रिकामी असल्याचे कारण पुढे करून बोळवण केली जाते. अर्थात महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही ही वस्तुस्थिती असली तरी जो काही पैसा महापालिकेच्या तिजोरीत जमा होतो.

हेही वाचा: मोबाईलमुळे संधिवाताचा धोका ते शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत

त्यातून प्राधान्याची कामे होतात, की वायफळ खर्च होतो हा मात्र गंभीर प्रश्‍न आहे. अर्थात सर्वच पैसा केवळ मूलभूत सोयी-सुविधांसाठीच खर्च होऊ शकत नाही. दरम्यान, तरतुदी कशा केल्या जातात व त्यातून कामे कशी उभी केली जातात हाही एक संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपये खर्च होत असले, तरी त्याचे दृश्‍यपरिणाम ठळकपणे मात्र पाहायला मिळत नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे. ८८ कामांचा समावेश गेल्या दीड महिन्यातच अर्थात ३ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर या कालावधीत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडील तब्बल ८८ विविध कामांना कार्यादेश दिले गेले. या सर्व ८८ कामांचा एकूण खर्च तब्बल १३ कोटी ८८ लाख ७३ हजार ९२० रुपये एवढा आहे. या कामांची यादी येत्या स्थायी समिती सभेपुढे केवळ अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे.

loading image
go to top