Amalner Marathi Sahitya Sammelan : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ

ग्रंथदिंडीस सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी. प्राध्यापक, शिक्ष्ाक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतां च्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते.
dindi started with Granth Pooja to sound of conch shells tala mridangam and drums in amalner marathi sahitya sammelan jalgaon news
dindi started with Granth Pooja to sound of conch shells tala mridangam and drums in amalner marathi sahitya sammelan jalgaon newsesakal

सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील.

अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. (dindi started with Granth Pooja to sound of conch shells tala mridangam and drums in amalner marathi sahitya sammelan jalgaon news)

ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता. सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीस सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी. प्राध्यापक, शिक्ष्ाक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतां च्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते.

दिंडी जशजशी पुढे पुढे जात होती तस तशी दिडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच व्दिगुनीत होत होता. ग्रंथदिंडीच्या मार्गापासून तर दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक ,स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले.

शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ
शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ esakal
dindi started with Granth Pooja to sound of conch shells tala mridangam and drums in amalner marathi sahitya sammelan jalgaon news
Amalner Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष्ा अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष्ा डॉ, भरतदादा अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत एक किलो मिटर अंतर पायी चालले, तर मंत्री महाजन यांनी दंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना मार्ल्यापर्ण करून अभिवादन केले.

या संस्थानांचा होता सहभाग

केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय,महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी.

dindi started with Granth Pooja to sound of conch shells tala mridangam and drums in amalner marathi sahitya sammelan jalgaon news
Amalner Marathi Sahitya Sammelan : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला साहित्य संमेलन तयारीचा आढावा

स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषद सर्व कर्मचारी अमळनेर, मराठी वाड:मंय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, पोलीस प्रशासन, प्रांताअधिकारी, महराष्ट्र मतदान विभाग.

फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माधमिक कॉलेज.

dindi started with Granth Pooja to sound of conch shells tala mridangam and drums in amalner marathi sahitya sammelan jalgaon news
Amalner Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे; रसिकांमध्ये मोठी उत्सुकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com