

Amalner Marathi Sahitya Sammelan : साने गुरुजी साहित्य नगरी,अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे.
मुख्य सभा मंडपासह उर्वरित दोन सभागृहांची उभारणी पूर्ण झाली आहे. (Preparations for Marathi Sahitya Sammelan amalner are completed jalgaon news )
मुख्य सभागृहातील व्यासपीठ तयार झाले असून, उर्वरित दोन सभागृहांच्या व्यासपीठांची उभारणी सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.१) बालसाहित्य संमेलनास प्रारंभ होणार आहे. साहित्य संमेलनानिमित्त अमळनेर शहराच्या विविध मार्गांवर विविध सामाजिक संस्थांनी स्वागत कमानी उभारून अमळनेर शहरात येणाऱ्या विविध साहित्यिकांचे स्वागत केले आहे.
दरम्यान, अमळनेर नगर परिषदेतर्फे साहित्य संमेलन स्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात आली असून, रस्तेही चांगले केले आहेत, तर पथदिव्यांचीही दुरुस्ती केली आहे. शुक्रवार (ता.२) पासून सुरू होणाऱ्या संमेलनासाठी गुरुवारी (ता.१) दुपारपर्यंत राज्यभरातील मराठी साहित्यिक, रसिक, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक दाखल होणार आहेत.
पूर्वनोंदणीनुसार निवास व्यवस्था
संमेलनास येणाऱ्या राज्यभरातील प्रतिनिधींची निवासाची व्यवस्था पूर्वनोंदणीनुसार केलेली आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ, मराठी वाङमय मंडळ, प्रताप महाविद्यालय यांच्या विविध समित्यांकडून तयारी पूर्णत्वाकडे नेली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.