जळगाव : मुक्‍या बापाची याचनाही प्रशासनासमोर हरली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Director of Education Cancer After four months bill sent for approval jalgaon

जळगाव : मुक्‍या बापाची याचनाही प्रशासनासमोर हरली!

जळगाव : शाळेत शिपाई असताना दोन वर्षांपासून पगार होत नाही. मुलाला कॅन्‍सरने ग्रासले असताना याबाबत वारंवार तक्रार करूनही माध्‍यमिक शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. यामुळे कॅन्‍सरग्रस्‍त मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी वडिलांनी शिक्षण उपसंचालकांसमोर हात जोडून विनवणी केली. परंतु, या मुक्या बापाची याचनाही प्रशासनासमोर हरल्‍याचे दिसतेय. कारण तब्‍बल चार महिन्‍यांनंतर बिल मंजुरीसाठी नाशिक विभागीय कार्यालयाकडे रवाना झाले असून, त्‍याचीही अद्याप प्रतीक्षा आहे.

जळगाव शहरातील राजेंद्र वामन जोशी यांची २०१९ मध्ये नूतन मराठा महाविद्यालयाच्‍या हातेड (ता. चोपडा) येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात बदली झाली. तेथे जोशी रुजूही झाले. मात्र, २०१९ पासून आजपर्यंत पगारच मुख्याध्यापकाने काढला नाही. याबाबत माध्‍यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दोन वर्षांपासून केलेल्या तक्रारींची दखल घेतली नाही. अशात जोशी यांना कॅन्सरने ग्रासले. पगार नाही, तरीही जोशी यांचा लढा सुरू आहे. आता तर ते खाटेवर खिळले आहेत. तरी देखील प्रशासनाला पाझर फुटलेला नाही.

बिल १५ मार्चला रवाना

राजेंद्र वामन जोशी या कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन ते अडीच वर्षाचे थकीत पगाराचे बिल जळगाव वेतन भविष्यनिर्वाह निधी अधीक्षक श्री. शर्मा यांच्याकडे दाखल केले आहे. सदर बिलाची रक्कम १३ लाख ८३ हजार ८०४ रुपये असून ही रक्कम आहे. ही रक्‍कम मिळावी याकरीता राजेंद्र जोशी यांचे वडील शिक्षण उपसंचालक हे १० डिसेंबरला जळगावी आले असताना हात जोडून याचना केली होती.

तेव्‍हा त्‍यांना तत्‍काळ बिल मंजुरीचे आश्‍वासन दिले. परंतु, आज चार महिने उलटून गेले असून, हे बिल मंजुरीसाठी जळगावहून अधीक्षक वेतन व भविष्यनिर्वाह निधी यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे १५ मार्चला पाठवलेली आहे. तसेच शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांनी २९ मार्चला शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलेले आहे.

मंजुरीची प्रतीक्षाच

या परिस्थितीत सदर कर्मचारी गेल्या आठ महिन्यांपासून कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असून सदर कर्मचाऱ्याचे बिल शिक्षण संचालक महेश पालकर हे मंजूर करतील की नाही याची शंका निर्माण होत आहे. शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याशी रवींद्र शिंदे यांनी दूरध्वनीवर संपर्क केला असता शिक्षण संचालकांनी सांगितले की माझ्याकडे एकही बिल पेंडिंग नाही.

Web Title: Director Of Education Cancer After Four Months Medical Claim Bill Sent For Approval Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top