
Jalgaon News : दिव्यांग व्यक्तीची जीवनाला कंटाळून आत्महत्या
Jalgaon News : तालुक्यात भिलाली व ताडेपुरा येथे दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ३१) घडली. (disabled person commits suicide jalgaon news)
ताडेपुरा येथील रहिवासी टॅक्सीचालक राकेश चंद्रकांत सातपुते (वय ३५) याने बुधवारी (ता. ३१) पहाटे दीडच्या सुमारास स्वतःच्या घरात छताच्या लोखंडी अँगलला सुताची दोरी बांधून आत्महत्या केली.
भावाने अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी सुनील पाटील तपास करीत आहेत. राकेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दुसऱ्या घटनेत भिलाली येथे दोन्ही पायांनी अपंग असलेला गुलाब धनसिंग गिरासे (वय ४७) हा कामासाठी पूर्णपणे पत्नीवर अवलंबून होता. जीवनाला कंटाळून त्यांनी बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेसहापूर्वी बाभळीच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला.
इंद्रसिंग गिरासे यांनी मारवड पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी किशोर पाटील तपास करीत आहेत.