पाणी भरण्यावरून वाद; एकाचा मृत्यू, तीन जखमी

विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाल्याची घटना घडली.
crime news
crime newsesakal
Updated on

पारोळा (जि. जळगाव) : शेळावे खुर्द (ता. पारोळा) येथे चिखलोड रस्त्यावर विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) घडली.

याबाबत बापू काळू सांगळे यांनी फिर्याद दिली, की विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणावरून संशयित राहुल दत्तू सांगळे (वय २२) व दत्तू काळू सांगळे (वय ४५) यातील राहुलने कार भरधाव वेगात आणून घटनास्थळी उभे असलेल्या अलका बापू सांगळे (वय ४५) यांच्या अंगावर नेऊन त्यांच्यासह विद्या महेंद्र सांगळे, मनीषा दत्तू सांगळे, अविनाश प्रभाकर सांगळे (सर्व रा. शेळावे खुर्द) यांना जबर जखमी केले. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. जखमी अलकाबाई सांगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. याबाबत पारोळा पोलिसांत वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत तपास करीत आहेत.

crime news
Jalgaon : गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक ऋषिकेश रावले व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.

crime news
बोगस बियाण्यांची कळंबू येथे 50 पाकिटे जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com