Jalgaon | जिल्हा बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ तर रोहिणी खडसेंना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohini Khadse

जिल्हा बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ तर रोहिणी खडसेंना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार

जळगाव - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ तर अध्यक्षा रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट आणि फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्यातर्फे आज शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात आला.

एनसीबीएस अर्थात ‘नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट’ आणि एफआयसीबी म्हणजेच ‘फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे कार्यक्रम २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी आभासी म्हणजेच व्हर्च्युअल स्वरूपात पार पडले.

हेही वाचा: धुळ्यात आमदार पवारांसमोर ‘राष्ट्रवादी’चे दोन गट भिडले

या परिषदेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. यात बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुस्काराने गौरविण्यात आले. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतांना बँकेला सहकार क्षेत्रातील अतिशय मानाचे दोन पुरस्कार मिळाले आहे. अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांनी आज शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बोलतांना सांगितले.

Web Title: District Bank Best Digital Bank Rohini Khadse Women Leader Of The Year Award

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..