
जळगाव : बंद ऑक्सिजन प्लांटबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
जळगाव : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन उत्परिवर्तित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. ऑक्सिजन प्लांटचे व्यवस्थापन केले जात आहे. यामध्ये आराखडा तयार केला जात असून त्यासाठी माहिती संकलन सुरू आहे.
ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अधिकाधिक लसीकरण वाढविण्यासह ऑक्सिजन, औषधी, बेड, लस व इतरही घटकांची मुबलक उपलब्धता आहे, की याची सर्वच यंत्रणांकडून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती घेतली. ‘सकाळ’ने मंगळवार (ता. ७)च्या अंकात ‘नऊ ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची जोडणी अपूर्ण’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतली आहे.
हेही वाचा: अकोला : ओबीसी संवर्गातील २७ जागांवरील निवडणुकीला
जिल्ह्यात ऑक्सिजनचा किती साठा आहे ? प्रकल्पांची काय स्थिती आहे ? याची माहिती घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर दिला जात आहे. यात चाळीसगाव येथे जवळपास सर्वच ऑक्सिजन प्रकल्पांना विद्युत जोडणीचा मुद्दा प्रलंबित राहिल्याने हे प्रकल्प सुरू झालेले नाही. आठवडाभरात हे काम होणार असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय मोहाडी येथील महिला रुग्णालयात ६०० बेडची व्यवस्था असून यापैकी २०० बेड हे सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमशी जोडलेले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४५० बेड हे सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमशी जोडण्यात आले आहेत. या ठिकाणी एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असून एक ऑक्सिजन टँक आहे. मोहाडी रुग्णालयात पुरेशा ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह जेथे ऑक्सिजन निर्मितीचे काम अपूर्ण आहे ते मार्गी लावा, अशा सूचना या पूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
Web Title: District Collector Reviews About Closed Oxygen Plant
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..