जळगाव : संबंधित गावाचे रहिवासी नसतानाही जळगाव जिल्हा दूध संघाच्या मतदारयादीत नावे नोंदविल्याने त्यांची नावे रद्द करावीत, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावरून न्यायालयाने गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांच्यासह १४ जणांना नोटीस बजावली आहे. त्यावर बुधवारी (ता. १६) सुनावणी होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.
याबाबत पत्रकार परिषदेत श्री. खडसे, की असोदा येथील जिल्हा दूध संघाचे सभासद खेमचंद महाजन यांनी न्यायालयात तातडीची पीटिशन दाखल केली आहे. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांच्यासह १४ लोकांची नावे जिल्हा दूध संघाच्या मतदारयादीत आहेत.(District Milk Union Notice to 14 people including Mahajan Patil Jalgaon News)
मात्र, ते ज्या गावाचे रहिवासी नाहीत. बनावट कागपत्रानुसार ठराव करून त्यांनी मतदारयादीत नाव नोंदविली आहेत. त्यामुळे त्यांचे नावे मतदारयादीतून रद्द करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.
न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून, बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे. न्यायालयाने गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांच्यासह १४ जणांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.