Latest Marathi News | पोलिस भरतीत ‘बॅण्डपथकाचा’ शासनाला पडला विसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Youth practicing band squat while waiting for police recruitment

Jalgaon : पोलिस भरतीत ‘बॅण्डपथकाचा’ शासनाला पडला विसर

जळगाव : कोरेाना काळात वय निघून गेलेल्या उमेदवारांना यंदाच्या पोलिस भरतीत दोन वर्षांचा रिलीफ मिळाला असला, तरी बॅण्ड पथकाचा या भरतीत शासनाने बॅण्ड वाजवून ठेवल्याने पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या हजारो तरुणांचा हिरमोड झाला आहे.

राज्य सरकारतर्फे यंदा पोलिस भरती जाहीर झाली असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरवात (ता. ९)पासून झाली आहे. पोलिस भरतीत नेहमीच बॅण्ड पथकाच्या जागा असतात. यंदा केवळ पोलिस शिपाई आणि पोलिस वाहनचालक या दोनच पदांसाठी भरती होत आहे.

बॅण्ड पथकाला कोण इच्छुक?

पोलिस बॅण्डचा तोरा वेगळाच असतो. दलात येऊ इच्छिणारे मात्र परमेश्वराच्या अवकृपेने उंचीत एक- दीड इंच कमी भरणारे तरुण प्रयत्नशील असतात. पोलिस होण्यासाठी आवश्यक १६५ सेंटीमीटर उंची आवश्यक आहे. मात्र बॅण्ड पक्षकासाठी अडीच इंचापर्यंत कमी उंचीची सवलत असते. या इच्छुक उमेदवारांना इतर उमेदवारांप्रमाणे पहाटे उठून धावणे, तासन्‌तास वाचनालयात घालवण्याव्यतिरीक्त वाद्य वाजवण्याचीही प्रॅक्टीस करावी लागते. दुसरीकडे भरती दरवर्षी घेतली जाते असे नाही. (Government forgot about band squad in police recruitment In 21 thousand 764 posts there is not a single band quad seat jalgaon News)

हेही वाचा: Monday Column : जळगावात खडसे Is Back, पण..!

कोणी ऐकून घेईना!

पोलिस भरतीसाठी प्रसिद्ध जाहिरातीत बॅण्ड पथकाचा उल्लेखच नाही. भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या आणि बॅण्ड पथकात भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या जळगाव शहरातील जवळपास ४० तरुणांचे शिष्टमंडळ जाहिरात निघाल्यापासून पाठपुरवा करतयं.

मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यांनीही पुढच्या भरतीसाठी बॅण्ड पथकाची पदे ठेवण्यात येतील, असे उत्तर दिल्याने या तरुणांचा पुरता हिरमोड झाला आहे.

"वडील हातमजुरी करतात. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी तीन वर्षांपासून सेक्सॉफोन वाजविण्याचा सराव करीत आहे. मात्र, यंदा शासनाने काढलेल्या जाहिरातीत बॅण्ड पथकाचा उल्लेखच नाही, म्हणून आम्ही मंत्री महोदयांची भेट घेत निवेदन दिले."

-सुरेश दांडगे

हेही वाचा: Jalgaon : शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विलंबाचा आरोप चुकीचा; शहर अभियंता एम. जी. गिरगावकर

"माझे वडील रिक्षाचालक आहेत. पोलिस होण्याची मनापासून इच्छा असल्याने दोन वर्षांपासून पोलिस भरतीसाठी सराव करतोय, पण यंदा बॅण्ड पथकाची भरतीच नसल्याने सर्व प्रयत्न वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शासनाने आमचा विचार करावा, ही अपेक्षा आहे."

-निशांत विसपुते

"बारावी उत्तीर्ण झाल्यापाासून शासकीय नोकरी मिळण्याचे स्वप्न आहे. त्यात पोलिस दलात येण्याची इच्छा आहे. मात्र, उंची कमी पडत असल्याने बॅण्ड पथकाची निवड केली व प्रॅक्टीसही सुरू आहे. अशातच बॅण्ड पथकाची भरती नसल्याने वाईट वाटतेयं. आताही वेळ गेलेली नाही. शासन दुरुस्तीपत्र काढू शकते."

-अविनाश वडाळे

"मी गेल्या ७-८ वर्षांपासून पोलिस भरतीसाठी सलग सराव करीत आहे. माझे वडील मजुरी करतात. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मलाही काम करावेच लगते. मिळेल ते काम करून पोलिस भरतीचा सराव करतोय. बॅण्ड पथकासाठी हजारो प्रयत्नशील तरुणांचा विचार करून शासाने शुद्धीपत्रक काढावे. जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल."

-गोकुळ कोळी

हेही वाचा: Jalgaon Crime News : जेष्ठ नागरीकाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यु

असे असते बॅण्डपथक

सेक्सॉफोन वादक, बिगुलर, प्लारनेट, ट्रॅमसेट, साईड ड्रम, बेसड्रम, ईफोनिक, अशा कुठल्याही एक वाद्य वादनात उमेदवार पारंगत असल्यास त्याची निवड होऊन त्याला ट्रेनिंगला पाठविले जाते.

अशी होणार भरती

पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या : २१,७६४ जागा

शैक्षणिक पात्रता : बारावी पास

वयोमर्यादा

खुला वर्ग : १८ ते २८ वर्षे

मागासवर्गीय : १८ ते ३३ वर्षे

परीक्षाक्रम : शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी, वैद्यकीय चाचणी आदी. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

हेही वाचा: Jalgaon Crime Update : रिक्षातील भामट्यांनी खिसा कापला