Latest Marathi News | संशयितांचे संचालक मंडळाकडे बोट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Milk Union News

District Milk Union : संशयितांचे संचालक मंडळाकडे बोट?

जळगाव : जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेतील संशयित कार्यकारी अधिकारी मनोज लिमये यांच्यासह इतरांच्या जबाबात आलेले मुद्दे आणि तपासात उघड बाबींमुळे पडद्याआड असलेल्यांकडेच रोख असल्याचे पोलिससूत्रांकडून समजते. आता या प्रकरणात त्रयस्थ अर्जदारची एन्ट्री झाली असून, दूध संघातील माजी अधिकारी एन. जे. पाटील यांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

जळगाव जिल्‍हा दूध उत्पादक संघात अगोदर अफरातफर झाल्याचा अर्ज एका गटाने केला, त्याला काउंटर करण्यासाठी दुसऱ्या गटाने नोंदीमध्ये तफावत समोर आणली. तद्‌नंतर चोरीची तक्रार आली. (District Milk Union Police Suspects to board of directors Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : जामदा ग्रामस्थांचे अवैध धंद्यांविरोधात कारवाई होत नसल्याने रौद्र रुप

या सर्व प्रकरणात न्यूट्रल भूमिकेतून प्रकरण आपसांत मिटवून टाकण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र, दोन्ही गटांतर्फे पोलिसांवर आरेाप-प्रत्यारोप सुरू झाले. अर्जाची चौकशी करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. गुन्हा दाखल करवून घेत नाहीत म्हणून उपोषणही करण्यात आले. तद्‌नंतर उच्च न्यायालयातही अपील करण्यात आले. अखेर सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

जबाबातून मुद्दे उघड

दाखल गुन्ह्यात इत्थंभूत पुरावे, दस्तऐवज ताब्यात आल्यावर अटकसत्र राबविण्यात येऊन कार्यकारी अधिकारी मनोज लिमये, हरी पाटील, अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल, चंद्रकांत पाटील, किशोर काशीनाथ पाटील अशा सहा संशयितांना अटक झाली. अटकेनंतर तपासात पोलिसांनी संकलित केलेले नमुने, आवश्यक दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारावर संशयितांचे जाबजबाब नोंदवून पंचनामेही करण्यात आले. संशयितांनी पुरविलेली माहिती, प्राप्त दस्तऐवजाच्या आधारे तपासातील प्रगती पाहता चेअरमन मंदाकिनी खडसे व संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता पोलिससूत्रांनी दिलेल्या संकेतावरून स्पष्ट होते.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Jalgaon : भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांचा शिवसेनेतर्फे निषेध व जोडे मारो आंदोलन

कॅन्टीन, पॅकेजिंगवालाही रडारवर

पोलिसांच्या माहितीनुसार, दूध संघात मुकेश निंबाळकर (शिवाजीनगर) यांना कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते, तर योगेश निंबाळकर तूप पॅकेजिंगचे काम करीत होता. यांसह प्रदीप पाटील या तिघांच्या नावे अखाद्य तूप घेतल्याच्या नोंदी सापडून आल्या आहेत. तपासाधिकाऱ्यांनी या तिघांचीही चौकशी केली आहे. प्रदीप पाटील याने मंगळवारी (ता. २२) दुपारी तीनला लेखी अर्ज सादर करून माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगत पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सी. एम. पाटील व हरी रामू पाटील यांना अटकसत्रापूर्वीच उचलून नेले होते. मात्र, दोघांनी प्रत्येकी २० हजार रुपये देऊन सुटका करून घेतल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.

पाटलांचे अपील

या प्रकरणात संशयितांची जिल्‍हा कारागृहात रवानगी झाली असून, संशयितांच्या टोळीतील म्होरक्याविरुद्ध पुरावे संकलनाचे काम पोलिस करीत आहेत. न्यायालयात दाखल खटल्यात आता माजी सैनिक, तसेच दूध संघातील माजी सुरक्षा अधिकारी एन. जी. पाटील यांनी त्रयस्थ अर्जदार म्हणून अपील केले आहे.

हेही वाचा: Jalgaon News : झोका खेळताना गळफास लागून मुलाचा मृत्यू