Latest Jalgaon News | जिल्ह्याधिकारी सलग दुसऱ्या दिवशी नदीपात्रात; वाळूमाफियांचे धाबे धणाणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Aman Mittal, Tehsildar Namdev Patil and revenue staff with the dumper seized in the area.

Jalgaon : जिल्ह्याधिकारी सलग दुसऱ्या दिवशी नदीपात्रात; वाळूमाफियांचे धाबे धणाणले

जळगाव : जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध वाळू उपशा करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात उठविलेले रान सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४)ही सुरूच होते. मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान श्री. मित्तल, तहसीलदार नामदेव पाटील यांनी खेडी, आव्हाणे परिसरात रात्री एक ते तीनदरम्यान ही मोहीम राबविली. या कारवाईत दोन डंपर जप्त केले. यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा धसका वाळूमाफियांनी घेतला आहे. (District officials in riverbed for second day in row two sand transporting truck seized Latest Jalgaon News)

गेल्या बुधवारी पहाटे जिल्हाधिकारी मित्तल यांनी वाळू चोरणाऱ्या व त्यांच्या वाहनाभोवती संशयास्पद फिरणाऱ्या तब्बल सात जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील काही जणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क पाठलाग केला होता. मात्र, निमखेडीतील गल्ली बोळाचा फायदा घेत काहीजण पळून गेले होते. मात्र, सात जणांना पकडण्यात त्याच्या पथकाला यश आले होते. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती.

शुक्रवारी पहाटे आव्हाणे, खेडी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, महसूल कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातील मध्यरात्री बॅटरीच्या प्रकाशात संभाव्य वाळू चोरीच्या ठिकाणावर पाहणी केली. नदीपात्रात कोणी वाहने टाकून वाळू काढत आहे का, याची शहानिशा केली. दोन डंपर पकडण्यात आले.

हेही वाचा: Nashik Crime News : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग; 3 वर्षांचा सश्रम तुरुंगवास

त्यातील एक डंपर (जीजे २१- ७४२४) व दुसरा विना क्रमांकाचा होता. वाहने पकडताच डंपरच्या वाहनचालकांनी पळ काढला. दोन्ही वाहने तालुका पोलिस ठाण्यात जमा करून पंचनामा करण्यात आला. सोबत वाहनमालकांवर गुन्हा नोंदविणे, विनाक्रमांकाच्या वाहनाच्या मालकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

असोदा मंडलाधिकारी रमेश वंजारी , म्हसावद मंडलाधिकारी अजिंक्य आंधळे, चिंचोलीचे तलाठी सुधाकर पाटील, कानळदा तलाठी ज्ञानेश्वर माळी, ममुराबाद तलाठी विरेंद्र पालवे, वाहनचालक सचिन मोहिते, मनोज कोळी, सुरक्षारक्षक शिंदे, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाइ केली.

हेही वाचा: SAKAL Exclusive : गडावर 2 स्वतंत्र मार्गांचा विचार; 4 रोप वे करण्याचे नियोजन