Telangana Assembly Election: तेलंगणामध्ये बीआरएस पक्ष 4 महिन्यात पुन्हा सत्तेवर येईल : जिल्हाध्यक्ष लकी टेलर

District president Lucky Taylor statement BRS party will come back to power in Telangana in 4 months jalgaon news
District president Lucky Taylor statement BRS party will come back to power in Telangana in 4 months jalgaon newsesakal

Telangana Assembly Election : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्ष पराभूत झाला असला, तरी येत्या ४ महिन्यात पुन्हा पक्ष सत्तेवर येईल, असा दावा पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर यांनी केला. बीआरएस पक्षात श्री. पाटील यांनी नुकताच प्रवेश केला. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.

विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये पक्षाला यश मिळावे म्हणून श्री. पाटील यांनी महादेवाला अभिषेक केला होता. (District president statement BRS party will come back to power in Telangana in 4 months jalgaon news)

जळगाव जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील यांनी तेलंगणात जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. तेलंगणात गेली दहा वर्षे सत्तेवर असलेल्या पक्षाने विकास केला असल्याचे श्री. पाटील यांचे म्हणणे आहे. तेथील काही भागात फिरून पाहणी केली होती.

त्यामुळे भारावले आहोत. असा विकास महाराष्ट्रात पक्षाचे नेते करतील, असा विश्‍वास श्री. पाटील यांना होता. परंतु पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तेलंगणाच्या जनतेने पक्षाला नाकारल्याने महाराष्ट्रात वाढ करण्याचा पक्षाचा उद्देश सफल होण्याची शक्यता कमी आहे. याचअनुषंगाने श्री. पाटील यांच्याशी संवाद साधला.

District president Lucky Taylor statement BRS party will come back to power in Telangana in 4 months jalgaon news
Telangana Assembly Election Result : MIM फॅक्टरमुळे BRS चा पराभव? KCR यांच्या पराजयाची पाच कारणं...

लकी टेलर म्हणाले, की काही लोक फुटून काँग्रेसमध्ये गेले आहेत. परंतु हे लोक काँग्रेसला सत्तेत काम करू देणार नाहीत. हे परत फुटून बीआरएस पक्षात सामील होतील. पुन्हा चार ते सहा महिन्यांनी आमच्या पक्षाची सत्ता येईल. श्री. राव यांच्यावर आजही जनतेचा विश्वास आहे.

आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, तरी आपण त्याच पक्षात काम करून पक्ष वाढवणार आहोत. श्री. राव यांना पक्ष कार्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. ते महाराष्ट्रात अधिक वेळ देऊन आपला पक्ष वाढवत जनतेचा विश्‍वास संपादन करतील. नशिराबाद येथे दोनशे जणांनी पक्षात प्रवेश केला आहे.

District president Lucky Taylor statement BRS party will come back to power in Telangana in 4 months jalgaon news
Telangana Assembly Election 2023 : काँग्नेसने बाजी मारली, KCR कुठे चुकले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com