Telangana Assembly Election Result : MIM फॅक्टरमुळे BRS चा पराभव? KCR यांच्या पराजयाची पाच कारणं...

BRS defeat due to MIM factor? Five Reasons for KCR's Defeat...
Telangana Assembly Election Result
Telangana Assembly Election ResulteSakal

Telangana Assembly Election Result 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसने बाजी मारत बीआरएसला मागे रेटलं आहे. मुख्यमंत्री केसीआर यांच्या हातातून सत्ता निसटून जात आहे. केसीआर यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय? ते पाहूया.

(Assembly Election Result)

दुपारी साडेबारा वाजता हाती आलेल्या कलांनुसार तेलंगणामध्ये काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे. तर केसीआर यांचा बीआरएस ४०, भाजप ९ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. केसीआर यांच्या हाततली सत्ता कशामुळे निसटली याची अनेक कारण सांगितली जातात.

परिवर्तन- तेलंगणा निवडणुकीच्या प्रचारामध्ये परिवर्तनाचा मुद्दा खुपच गाजला. विद्यमान सरकारच्या विरोधात चोहोबाजूंनी हल्लाबोल झाल्याने आता राज्यात बदल हवा आहे, अशी एक लाट तयार झाली. काँग्रेसने अलगदपणे त्या लाटेवर स्वार होत स्वतःला परिवर्तनाचं साक्षिदार केलं. २५ टक्के मतदारांनी परिवर्तनासाठी मतदान केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर स्पष्ट झालं होतं.

(Telangana Result)

Telangana Assembly Election Result
K. Chandrashekar Rao BRS News: केसीआर यांचा डाव अनिल देशमुखांनी हाणून पाडला, पदाधिकार्यांची ३ दिवसात घरवापसी

घोटाळ्यांचे आरोप- भाजप आणि काँग्रेसने केसीआर यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले आणि कौटुंबिक सरकार म्हणून हिणवलं. केसीआर हे कुटुंबासाठी सरकार चालवतात असा आरोप त्यांच्यावर झाला. त्याचा परिणाम निकालांमध्ये उमटला आहे.

मुस्लिम मतदार- तेलंगणा राज्यातील ४० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. एकीकडे भाजपने थेटपणे मुस्लिम आरक्षण काढून घेण्याची भूमिका जाहीर केली होती. दुसरीकडे काँग्रेसने मुस्लिमांसाठी विविध योजना जाहीर करुन एक प्रकारे संरक्षण देण्याच्या घोषणा केल्या. त्यामुळे काँग्रेसकडे मुस्लिम मतदार आकर्षित झाले.

Telangana Assembly Election Result
Chhattisgarh Election Results: छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेजवळ; मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहेत प्रबळ दावेदार?

एमआयएम फॅक्टर- एमआयएमला मुस्लिमांचा पक्ष म्हटलं जात असलं तरी एमआयएमला मतदान म्हणजे भाजपला फायदा, असं सूत्र मागच्या काही वर्षांपासून तयार झालं. त्यामुळे भाजपला फायदा करुन देणयापेक्ष थेट काँग्रेसला साथ देणं मुस्लिम मतदारांनी पसंद केलं.

बीआरएस भाजपची बी टीम- बीआरएसचा भाजपची बी टीम असल्याची टीका काँग्रेसने केली होती. प्रत्येक सभेमध्ये भाजपने केसीआर यांना टार्गेट करताना भाजपशी संबंध जुळवले. त्यामुळे मुस्लिम मतदार बीआरएसपासून दूरावला गेला. त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com