Latest Marathi News | शेतकऱ्यांना दूध खरेदी दरवाढीची दिवाळी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Milk Union

District Milk Union : शेतकऱ्यांना दूध खरेदी दरवाढीची दिवाळी भेट

जळगाव : येथील जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची शुक्रवारी (ता. २१) झालेल्या सभेत आजपासूनच दूध उत्पादकांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय झाला. संचालक मंडळाच्या या निर्णयाने दूध उत्पादकांना दिवाळी भेट मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या सभेतील निर्णयानुसार आजपासून दूध उत्पादकांसाठी गाय दूध खरेदी दरामध्ये २ रुपये १० पैसे प्रती लिटर तसेच म्हैस दूध खरेदी दरामध्ये १ रुपया ४० पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे.(Diwali gift of milk purchase price hike to farmers by district milk union Jalgaon News)

हेही वाचा: Diwali Update : सावधान ! फटाक्यांच्या धुरामुळे फुफ्फुसे, डोळे होताहेत निकामी

यामुळे आता गाय दूध खरेदी दर ३६ रुपये प्रतिलिटर तर म्हैस दूध दर ८२० किलो फॅट किंवा ५७ रुपये ४० पैसे प्रति लिटर राहतील.

सर्व संचालक मंडळाच्यावतीने दूध संस्थेच्या चेअरमन व पंचकमेटी सदस्यांना वाढीव दूध दराचा फायदा जास्तीत जास्त दूध उत्पादकांना देवून संस्थेच्या दूध संकलनात वाढ करून जास्तीत जास्त उत्तम गुणवत्ता प्रतीच्या दुधाचा पुरवठा दूध संघास करावा, असे आवाहन चेअरमन मंदाकिनी एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

हेही वाचा: शब्बास रे पठ्ठ्या! ट्रकच्या ओडोमीटरचा वापर करून काढला लॉटरीचा नंबर अन् जिंकले २० लाख