शब्बास रे पठ्ठ्या! गाडीच्या ओडोमीटरचा वापर करून काढला लॉटरीचा नंबर अन् जिंकले २० लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Truck

शब्बास रे पठ्ठ्या! ट्रकच्या ओडोमीटरचा वापर करून काढला लॉटरीचा नंबर अन् जिंकले २० लाख

नवी दिल्ली - लॉटरीत मोठी रक्कम जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, पण प्रत्यक्षात मात्र मोजक्याच लोकांचं हे स्वप्न पूर्ण होतं. अमेरिकेतील मेरीलँड येथील एका व्यक्तीने आपल्या ट्रकच्या तुटलेल्या ओडोमीटरमचा नंबर वापरून जॅकपॉट जिंकला आहे. यूपीआयच्या एका रिपोर्टनुसार, हरफोर्ड काउंटीच्या 60 वर्षीय डग्लस ए यांनी 27 वर्षात तिसरा जॅकपॉट जिंकला आहे. (lottery news in Marathi)

हेही वाचा: Shivsena: "अब्दुल सत्तार आमच्या पाया पडायचे पण त्यांना आता मस्ती आलीये"

डग्लस यांनी मेरीलँड लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी जोप्पामधील रॉयल फार्म्समध्ये ५ ड्रॉइंग्जसाठी ५० टक्के तिकीट खरेदी केले. Tencounty.com यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीने एक ट्रक विकत घेतला ज्याचा ओडोमीटर ८२,४६६ किमीवर बंद पडला होता, म्हणून तो दररोज ८-२-४-६-६-६-६ या क्रमांकांसह लोट्टो लॉटरी खेळायचा. जेव्हा त्याचा नंबर लागला तेव्हा त्याने तब्बल २५,००० डॉलर्स (२० लाख रुपये) जिंकले.

हेही वाचा: Land Scam: देवस्थानची शेकडो एकर जमीन लाटली; भाजपचा बडा नेता अडकण्याची शक्यता

लॉटरीच्या माध्यमातून डग्लस यांनी आयुष्यात तिसऱ्यांदा इतकं मोठं बक्षीस जिंकलं आहे. १९९५ साली त्यांनी ५०,० डॉलर्स जिंकले आणि २००८ मध्ये त्यांनी स्क्रॅच-ऑफच्या तिकिटावर १,००,००० डॉलर्स जिंकले. मात्र, त्यांनी ओडोमीटर रीडिंगचा वापर केला नव्हता.

टॅग्स :americalottery