
‘तो’ क्यूआर कोड स्कॅन करू नका
धुळे : कोविड टेस्ट किंवा वैद्यकीय चाचण्यांसाठी अॅडव्हान्स रक्कम देत असल्याचे सांगत यूपीआय क्यूआर कोड पाठवला जातो. तो यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करू नये, असे व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. अन्यथा आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी नागरिकांना दिला आहे.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
सध्या सायबर गुन्हेगार शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिकांना फोन करून ते भारतीय सैन्य दलातील अधिकारी, कर्मचारी आहेत, असे भासवून त्यांच्या येथील अधिकारी, कर्मचारी यांचे कोविड टेस्ट किंवा वैद्यकीय चाचण्या करावयाच्या आहेत, असे सांगून त्यासाठी अॅडव्हान्स रक्कम देत असल्याचे, पैसे पाठवत असल्याचे सांगत यूपीआय क्यूआर कोड पाठवला जातो व तो यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. संबंधित नागरिक पैसे येणार म्हणून सायबर गुन्हेगारांनी पाठवलेला यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करतात व आपला यूपीआय पीन टाकतात, त्यानंतर मात्र आपल्या खात्यातील पैसे कपात होतात.
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
अशाप्रकारे आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे याबाबत सर्व नागरिकांनी असे व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाणे व जिल्हा पोलिस दलाने केले आहे. सायबर अपराध झाल्यास तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, https://cvbercrime.gov.in/ या पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहनही पोलिस निरीक्षक गोराडे यांनी केले आहे.
Web Title: Do Not Scan Qr Code For Advance Covid Test
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..